गडचिरोली:-आष्टी मार्गे मुलचेराकडे एका कार मधून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी वनविभागाच्या चेक पोस्ट जवळ सापळा रचत अवैद्यरित्या सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या मारुती सुझुकी अल्टो कारला ताब्यात घेतले.यावेळी तब्बल 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुलचेरा तालुका मुख्यालयातील वन विभागाच्या चेक पोस्ट जवळ सापळा रचून मारुती सुझुकी अल्टो कार क्रमांक MH-34-AA-0250 या वाहनाची झडती घेतले असता त्या वाहनात प्रतिबंधीत मजा व तंबाखूजन्य विषारी पदार्थ आढळून आले.89 हजार 700 रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि मारुती सुझुकी अल्टो कार असे एकूण 4 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्राणकुमार गांधीराज सरकार (वय 40, रा-देशबंधुग्राम,तालुका-मुलचेरा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून मुलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांनी केली आहे.
आलापल्ली ते आष्टी रस्त्याची दुरावस्था झाल्याने मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर आणि गडचिरोली कडे जाण्यासाठी मुलचेरा मार्गाचा वापर होत आहे.त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे.अश्यात काही खाजगी वाहनातून विदेशी दारू व सुगंधित तंबाखूची तस्करीही वाढली आहे.सध्या मुलचेरा पोलीसांची धडक कारवाई सुरू असून दारू व तंबाखू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.