अहेरी:- नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला सुयश मिळाले आहे.
अहेरी विधानसभेतील 7 ग्रामपंचायत मधील सदस्य पदांसह थेट सरपंच साठी 16 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि 18 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.9 नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अतिदुर्गम अश्या मन्नेराजाराम,आरेंदा आणि खांदला या तीन ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले.
यामध्ये भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम ग्रामपंचायत मध्ये कु मनीषा शंकर मडावी,अहेरी तालुक्यातील आरेंदा ग्रामपंचायत मध्ये बुज्जी रामजी आत्राम आणि खांदला येथे राकेश देबडू सिडाम उपसरपंच पदावर विराजमान झाले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यांनी या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय तथा जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकारी तथा तळागाळातील कार्यकर्त्यांना दिले आहे.