वरोरा :आनंदवन मित्र मंडळ आणि डॉ. विकास आमटे अमृत महोत्सवी सत्कार समितीतर्फे मंगळवारी (ता. ८) ला डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. तात्यासाहेब लहाने, आयोजन समितीचे दगडू लोमटे, नरेंद्र मिस्त्री उपस्थित होते.
डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशाचे वाचन केले.
याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डॉ. विकास आमटे यांचा सन्मान चित्र भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे, नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोरेकर, आदी उपस्थित होते.
आयोजन समितीच्या वतीने याप्रसंगी महारोगी सेवा समिती आनंदवनला वीस लाख ७५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. न्या. सिरपूरकर यांच्या हस्ते डॉ. विकास आमटे व डॉ. भारती आमटे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ७५ लेख असलेल्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. मानपत्राचे वाचन मधुरा वेलणकर यांनी केले.
प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. संचालन उपप्राचार्य राधा सवाने, प्राध्यापक मोक्षदा मनोहर यांनी केले. आभार नरेंद्र मिस्त्री यांनी मानले.