-आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी ( मेघे ) आणि रव. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा संयुक्त उपक्रम
भद्रावती :- तालुक्यातील पिपरी ( देश. ) येथे दि.१४ नोव्हेंबर रोज सोमवारला श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानांर्तगत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी ( मेघे ) आणि रव. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे .या शिबिरात मेडिसीन तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थीरोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ, कान नाक घसा रोग तज्ञ आणि श्र्वसन रोग तज्ञ सहभागी होत असून विविध आजारांचे निदान व उपचार करण्यात येईल. सदर शिबिर यापूर्वी झालेल्या पुरग्रस्त गाव परीसरात आयोजित करण्यात आले आहे.पिपरी ( देश. ), मुरसा, घोनाड, कोची, तेलवासा, चिरादेवी आणि ढोरवासा येथील जनतेनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन रव. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी केले आहे. भरती रुग्णांना दवाखान्यात ये- जा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबिरामध्ये येतांना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे.
शिबिराच्या दिवशी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत रुग्ण नोंदणी केल्या जाईल. या शिबिरात ट्रस्टच्या माध्यमातून गरीब व गरजुरुग्णांचा मोफत उपचार करण्यात येईल. शिबिराचे उद्घाटन आनंदवन वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या शुभहस्ते करण्यात येईल या प्रसंगी अध्यक्षस्थानी अँड. पुरुषोत्तम सातपुते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्य डॉ. विजय देवतळे, भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, माजी जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे,श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले,रव. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यवाहक भास्कर ताजणे, पिपरी ( देश. ) च्या सरपंच अर्चना नांदे, सर्वाभौम ग्राम पिपरी ( देश. )चे अध्यक्ष पंढरी पा. कुटेमाटे व अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष तथा माजी सरपंच संदिप कुटेमाटे उपस्थित राहतील.