गडचिरोली:-मुलचेरा नगर पंचायतीच्या हद्दीतील विविध प्रभागात एक कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामे होणार असून नुकतेच येथील अध्यक्ष विकास नैताम यांच्याहस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मुलचेरा तालुका अध्यक्ष गौरव बाला,नगर पंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, महिला बालकल्याण सभापती मोहना परचाके,पाणी पुरवठा सभापती सुनीता कोकेरवार,नगर सेविका सपना मडावी, नगरसेविका जास्वंदा गोंगले, नगरसेविका मनीषा गेडाम,नगरसेविका यामिना हिवरकर,नगरसेविका मंगला आलाम, नगरसेवक काशिनाथ कन्नाके, नगरसेवक विजय कुळमेथे,नगरसेवक देवा चौधरी, दीपक बिश्वास,उत्तम बिश्वास,सखाराम दिवटीवार,प्रभाकर येलमुले,रवी झाडे, संदीप रतनपुरे,गणपत मडावी,सुनील बावणे,देविदास परचाके, संदीप कोंड्रावार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलचेरा नगरपंचायत हद्दीत मुलचेरा, अंबेला, कोपरअली,बारसवाडा या चार गावात एकूण 17 प्रभाग असून बरेच प्रभागात अजूनही सिमेंट रस्ते,नाली बांधकाम नसल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.या विविध प्रभागात सिमेंट रस्ते,नाली बांधकामसह आदी विकासकामे करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मुलचेरा तालुकाध्यक्ष गौरव बाला यांनी निधीची मागणी केली. तालुका मुख्यालयातील विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात तब्बल एक कोटींची निधी दिली असून येत्या काळात टप्प्याटप्प्याने मोठी निधी देण्याचे आश्वासनही दिले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाता असल्याने मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून नगरपंचायत हद्दीतील गावांचा चेहरामोहरा बदलविण्यात येणार आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधीसोबत सामान्य नागरिकांनीही योगदान द्यावे असे आवाहन गौरव बाला यांनी केले.4 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 17 मध्ये मल्ला बंडावार ते मधुकर तुनकलवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन येथील नगराध्यक्ष विकास नैताम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून उर्वरित सर्व विकास काम लवकरच सुरू होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला.