जय सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा
संस्थापक गौरीशंकर खुराणा यांचा स्वर्ण निर्णय
सुमित हेपट मारेगाव :तालुक्यात सामाजिक कार्याने प्रकाशझोतात आलेली जनहीत कल्याण संघटनेने ऍड. देविदास काळे यांच्या जय सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा दिला असुन शेतकऱ्याप्रती कृतज्ञ राहून कार्य करणाऱ्या आणि समाजाच्या तळागाळातील सेवाभाव आणि समस्यांचे निराकारण करनाऱ्या विश्वासपात्र ठरलेल्या संघटनेचा पाठिंबा म्हणचे पातेल्यातले दुध उतु जावे असे म्हणावे लागेल.
वसंत जिनींगच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत चार पॅनल असून यातील ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनल असुन डुबती नाव पाण्यातून वर यावी अशी कामगिरी अध्यक्ष पदावरून करून सहकार क्षेत्रात वेगळी छाप मिळवली असतांना जनतेचा विश्वास संपादन केला.पाहू, करू, बघुन घेऊ अशी भाषा न वापरता कार्य कृतीतून उतरविले. आश्वासानाची खैरात पायदळी तुडवून कामाला महत्व देणारे व्यक्ती ठरले. त्यांच्या कार्याची पावती त्यांना मिळतेच हे जनतेतुन बोलल्या जात आहे.
चांगले कार्य करणाऱ्यांच्या कार्याला नेहमी दुजोरा देणारी अग्रनी जनहीत कल्याण संघटनेने मारेगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी यात जिथे समर्थन दिले तिथे पदरी विजय मिळाला, तसेच ग्रामपंचायत निवडणुकामध्ये पॅनल उभे केलेत यात सुद्धा यश संपादन करता आले.जनसेवा हेच एकमेव ध्यास असलेली पूरग्रस्त भागात किराणा, गृहउपयोगी वस्तु,आरोग्य सुविधा, अन्नधान्य पूरवून प्रत्येक कुटुंबाची काळजी घेतली.आरोग्य सुविधेत इसीजी मशीन, रुग्णवाहीका, चोवीस तास कार्यरत रुग्णसेवक चमू पुरवित आहेत. वाढत्या शहरीकरणाने मारणोत्तर यातना होऊ नये म्हणुन शववाहिनी लोकार्पण केली. तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबान्ना आर्थिक मदत करून कोणत्याही समस्या असल्यास संपर्कात राहण्याचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांची बदलत चाललेल्या मानसिकतेला चालना मिळावी, आत्महत्येस कोणी प्रवृत्त होऊ नये. समस्यांचे निराकरन व्हावे करीता कॉल सेंटर चालवून समस्या सोडवून अनेकांचे जिवन प्रकाशमय करता आले. दिवाळीच्या पर्वावर आत्महत्याग्रस्त आणि गरीब कुटुंबाना तीन महिन्याचा किराणा, गृहउपयोगी साहित्य भेट देण्यात आली. शासकीय लाभ, मोफत आरोग्य सुविधा यासह सेवेची स्वतःहून संधी मागितली.मारेगाव शहरात पावसाळ्यात अनेक रस्ते चिखलमय झाले असता मुरूम पुरविण्यात आला रस्याने येजा करण्याची सुविधा जनतेकारिता केली.फार कमी कालावधीत जनाधार मिळवणारी मारेगाव तालुक्यातील अग्रनी संघटना ठरली. सामाजिक चळवळीने प्रख्यात झालेली जनहीत कल्याण संघटनेच्या कार्यप्रणाली जाणून घेण्याकरिता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थापक गौरीशंकर खुराणा यांची भेट घेत असतात.
वसंत जिनींगच्या निवडणूक रनधुमाळीतील ऍड. देविदास काळे यांच्या पॅनलला जनहीत कल्याण संघटनेचा पाठिंबा संस्थापक गौरीशंकर खुराणा, अध्यक्ष समिर कुडमेथे, सचिव निलेश तेलंग, उपाध्यक्ष रॉयल सय्यद यांनी जाहीर केला आहे.