गडचिरोली:-अहेरीचे सुपुत्र आणि उत्कृष्ट कराटे पटू म्हणून ओळख असलेले रवी भाऊराव भांदककर यांनी नुकतेच सप्टेंबर महिन्यात थायलंड येथे झालेल्या जागतिक मीट व वर्ल्ड मिक्स मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत ‘सुवर्ण’ कमाई केली होती.आता त्यांची निवड मलेशिया येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.ते मलेशियात भारत देशाचे नेतृत्व करणार आहेत.मात्र,त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने विदेशात जाऊन त्याठिकाणी राहण्यासाठी मोठी रकमेची गरज होती.ही रक्कम न मिळाल्यास विदेशात जाऊन कराटे स्पर्धेत आपल्या भारत देशाचा नेतृत्व करण्याची संधी हुकणार म्हणून ते चिंतेत होते.याची माहिती अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा दाखवून कराटे पटू असलेले रवी भाऊराव भांदककर यांना बोलावून आर्थिक मदत केली.त्यामुळे रवी भांदककर यांचा मलेशिया जाण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.
थायलंड मधील बँकॉक येथे झालेल्या कराटे स्पर्धेत अमेरिका, थायलंड, म्यानमार, पाकिस्तान, मलेशिया, भारत, इंडोनेशिया आणि इंग्लंड हे आठ देश सहभागी झाले होते.जागतिक कराटे मार्शल आर्ट स्पर्धेत भारताच्या 20 सदस्यांच्या चमुमध्ये अहेरीचे रहिवासी रवी भांदककर यांचा समावेश होता. त्यांना जागतिक क्रीडा मास्टर्स व स्पर्धेतील सुवर्णपदक अमेरिकेचे ग्रँड मास्टर टोनी लेयर व थायलंडच्या क्वीन मिसथाई यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.भांदककर यांची 23 सप्टेंबर रोजी दुबई येथे पार पडलेल्या जागतिक मीट व स्पर्धेकरिता निवड झाली. स्पर्धेकरिता सपत्नीक सहभागी झालेल्या त्यांच्या अर्धांगिनी किरण भांदककर यांना इंडियन गेस्ट अवॉर्ड ने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.आता त्यांची निवड मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली असून त्यांना भारत देशाचा नेतृत्व करण्यासाठी मलेशिया येथे जायचे आहे.याही स्पर्धेत आपल्या भारत देशाचा नावलौकिक करण्यासाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्यांना शुभेच्छा दिली.एवढेच नव्हेतर त्यांनी मलेशिया येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची दानशूर म्हणून ओळख आहे.कै.धर्मराव महाराज सुद्धा आपल्या राजमहालात येणाऱ्यांना कधीच खाली हात पाठवत नव्हते.तीच परंपरा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सुरू ठेवली आहे.विशेष म्हणजे कुठलीही अडचण आणि विविध खेळासाठी देणगी म्हणून येणाऱ्यांना आणि विशेष म्हणजे दुर्दर आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी राजे मोठ्या मनाने आर्थिक मदत करतात.यावेळी तर राजनागरीतील रवी नावाचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विदेशात जाऊन भारताचा नेतृत्व करणार आहे. मग,राजे कसे मागे राहतील ? अखेर त्यांनी आर्थिक मदत करून रवी भांदककर यांचा मलेशिया जाण्याचा मार्ग सुकर केला.राजेंनी एका खेळाडूची भावना समजून आर्थिक मदत केल्याने भांदककर यांनी सुद्धा राजेंचे आभार मानले.