गोंडपिपरी-गोंडपिपरी-खेडी(मूल) मार्गाच्या रस्त्याच्या कंत्राटदाराच्या मनमानी निकृष्ट भोंगळ कामामुळे गोंडपिपरी-खरारपेठ-वढोली मार्गावर उदभवलेल्या समंस्याबद्दल गुरुवारी (दि.३) दुपारी १२ वाजता खरारपेठ मुख्य मार्गावर रास्तारोको करण्यात आला.यावेळी तब्बल एक तास शेकडो शिवसैनिकांनी वाहतूक अडवून धरली.
गोंडपिपरी-खेडी(मुल) मार्गाचे काम तीन वर्षापासून कासव गतीने सुरू आहे.या मार्गावर ठिकठिकाणी अर्धवट काम करण्यात आलेला आहे.अश्यातच रस्ता खोदणे सुरू आहे.कंत्राटदाराच्या चुकीमुळे दिवसांगणित अपघातात वाढ होत आहे.रस्त्यावर पसरलेली गिट्टी आणि गिट्टीमुळे सतत निघणारी धुळ याकडे प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे.असा आरोप करत तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या नेतृत्वात काही प्रमुख मागण्या घेऊन शिवसेनेने रास्तारोको आंदोलन केले.खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करावे,गिट्टी पसरवलेल्या ठिकाणी रोज पाणी मारण्यात यावे,अर्धवट काम पूर्ण केल्याशिवाय खोदकाम करू नये,अशा अनेक मागण्यांचे निवेदन रास्तारोको आंदोलनानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.सात दिवसात समस्यांचे निवारण न झाल्यास बांधकाम विभागासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा ईशारा देखिल शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवार यांनी आंदोलनादरम्यान दिला.यावेळी शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,तालुका उपप्रमुख विवेक राणा,युवासेनेचे गौरव घुबडे,वढोली तंमुस अध्यक्ष संदिप लाटकर,ग्रा पं सदस्य संदिप पौरकार, किशोर चुदरी,दिनेश मेकर्तीवार,अमित भोयर,गोकुळ सोनटक्के,शुभम माडुरवार,अजित कोहपरे,राहुल मेकर्तीवार,सारंग गोंगले,समीर झाडे,महेश लडके,अनिकेत मंडवगडे,अविनाश मेश्राम,चिना मारटेवार,गुडू कन्नक्के,धनंजय मेश्राम,सुधीर अवथरे,शुभम भोयर,अक्षय भोयर,उमेश उपासे,निखिल आत्राम,प्रशांत निखाडे,गणेश भोयर,कार्तिक बत्ते,विशाल चंद्रगिरीवार,उमेश भोयर,मानव बांगरे,विनोद अलोने,साईनाथ पोतरजवार यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.