बल्लारपूर – बल्लारपूर शहरातील श्री पंचमुखी हनुमान गजानन महाराज सेवा समिती बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर शहरातील गरीब, गरजु, बेघर व दिव्यांगाना रेशन चे किट वितरण करण्यात आले .
कोरोना महामारी च्या संकटानंतर अनेकांच्या हातातून रोजगार निघून गेला व बेरोजगार झाले. तर काहींना काम मिळणे सुद्धा कठीण झाले आहेत.
त्यातच काही दिव्यांग बांधवांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. गरिब व गरजूंना या साठी मदत व्हावी यासाठी म्हणून बल्लारपूर शहरातील श्री पंचमुखी हनुमान व गजानन महाराज सेवा समितीने पुढाकार घेऊन बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाळ वार्ड, कन्नमवार वार्ड, गोकुळ नगर वार्ड, येथील दिव्यांग व गरजूं यांच्या शोध घेऊन त्यांना रेशन किट चे वितरण केले या प्रसंगी श्री पंचमुखी हनुमान व गजानन महाराज सेवा समिती चे संतोष येल्लावार, बेबी काळे, गीते, शुभांगी तिडके, माया यादव, अरूणा राजूरकर, वर्षा सुंचुलवार पोर्णिमा कोत्तपल्लिवार व अन्य पदधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













