– स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचंद्रपूरचे आयोजन –
भद्रावती = स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचंद्रपूरच्या विद्यमाने स्थानिक श्री मंगल कार्यालयात येत्या १३ ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत राष्ट्रीय पातळीवरील वेटलिफ्टींग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच वरोरा व भद्रावती तालुक्यातील कबड्डी खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा ,दिव्यांग बांधवांना सायकल वितरण ,भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणाऱ्यांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडू आपआपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. याप्रसंगी आनंदवन वरोरा येथील स्वरानंद ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या खेळाडूंचे भव्य स्वागत व त्या सर्वांचे शहरवासियांना दर्शन व्हावे या द्दष्टीने सर्वप्रथम प्रेरणा रॅली काढण्यात येईल.
विशेष म्हणजे भद्रावतीत ऐतिहासिक नगरीत होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील वेटलिफ्टिंग स्पर्धातील विजेत्या ठरणाऱ्या खेळाडूंची दुबई येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार आहे. उपरोक्त स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यातून सहाशे वेटलिफ्टर्सचे भद्रावतीत आगमन होणार आहे. यात सुमारे दोनशे तीस महिला वेट लिफ्टर्सचा सहभाग असेल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सुमारे सत्तर टक्के वेटलिफ्टर्स उच्च पदावर कार्यरत आहे. यातील काही आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी सुध्दा आहे.
मध्यप्रदेश २१, आसाम ३१, बिहार १४, चंदिगड २, छत्तीसगड १७, दिल्ली १३, गोवा ९, गुजरात १०, हरियाना २५, जम्मु काश्मीर १७, झारखंड ५, कर्नाटक १३, केरळ ४१, मध्य प्रदेश ६३, महाराष्ट्र ५७, मनिपूर ४१, मिझोरम ७, पाँन्डेचरी २, राजस्थान १८, तामिलनाडू २१, तेलंगना २७, त्रिपुरा ९, उत्तर प्रदेश १४, उत्तराखंड १०, विदर्भ २४ आणि पश्चीम बंगाल २७ यावेटलिफ्टर्सचा समावेश आहे. यांच्यासह स्वतः वेटलिफ्टर असलेल्या कोच व पंच याचा सुध्दा या स्पर्धेत सहभागी राहतील. यामधील ११७ वेटलिफ्टर्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. हे विशेष. सहभागी वेटलिफ्टर्स रात्रो आपल्या राज्यातील विविध सांस्कृतिक कार्यकम सादर करतील
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक माजी आमदार कै. म.ना. पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य कबड्डी चषक स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहे. या स्पर्धात वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील शेकडो खेळाडू सहभागी होतील. कबड्डी स्पर्धात सहभागी खेळाडू सुध्दा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
थोर समाज सेवक श्रद्धेच बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात येईल. भव्य रक्तदान शिबिर सुध्दा आयोजित करण्यात आले आहे. जनतेनी सक्रिय सहभाग घेवून क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव अत्यंत शांतता पूर्ण वातावरणात पार पाडण्यास सहकार्य करून या उपक्रमांचा आनंद लुटावा. असे आवाहन स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक रविंद्र शिंदे यांनी केले आहे.