भद्रावती :- स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचंद्रपूरच्या विद्यमाने स्थानिक श्री मंगल कार्यालयात येत्या १३ ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत राष्ट्रीय पातळीवरील वेटलिफ्टींग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच वरोरा व भद्रावती तालुक्यातील कबड्डी खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा ,दिव्यांग बांधवांना सायकल वितरण ,भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणाऱ्यांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडू आपआपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. याप्रसंगी आनंदवन वरोरा येथील स्वरानंद ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या खेळाडूंचे भव्य स्वागत व त्या सर्वांचे शहरवासियांना दर्शन व्हावे या द्दष्टीने सर्वप्रथम प्रेरणा रॅली काढण्यात येईल.
याच कार्यक्रमात दि. १३ ऑक्टोंबर रोजी १२वा.अमेरिकेच्या जगप्रसिध्द ‘फोर्ब्स’ मॅगझिनने दखल घेतलेला चंद्रपूर च्या मातीतील कलाकारांनी बनविलेला आणि सर्वत्र चर्चेत असलेला मराठी चित्रपट ‘ पल्याड ‘ चित्रपटाचे प्रमोशन व आदर्श विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पल्याड चित्रपटाचे टीजर आणि मोशन पोस्टर व उंच उंच उडू हे सॉंग झी म्यूझिक आणि राजश्री मीडियाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले असून चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात अवघ्या २५ दिवसात पूर्ण झाले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची दखल प्रसिद्ध फोर्ब्स मासिकात झाली आहे. एलिवेट फिल्म व एलिवेट लाईफ आणि लावण्यप्रिया आर्ट्स’ च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली असून या चित्रपटाचे निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भिमराव दुपारे आहेत. एलीवेट फिल्म्स आणि लावन्याप्रिया आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट तयार झाला आहे. पल्याडचे दिग्दर्शन शैलेश भीमराव दुपारे यांनी केले आहे.तसेच कथा सुदर्शन खडांगळे तर लेखन व संवाद सुदर्शन खडांगळे यांचे आहेत. सहनिर्माते रवींद्र शालिकराव वांढरे, शिवशंकर रवींद्रनाथ निमजे, लक्ष्मण रवींद्रनाथ नीमजे, माया विलास निनावे, गौरवकुमार वनिता पाटील, रोशनसिंघ बघेल आहेत.
चंद्रपूरच्या स्थानिक कलाकारांना घेऊन, तसेच मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील राष्ट्रीय पारितोषिक विजेते व नामवंत अभिनेता रेडू चित्रपटातील आणि देवाक काळजी घे ह्या मराठी गान्यातील अभिनेता शशांक शेंडे, आणि नाळ फिल्म मधील देविका दफ्तरदार आणि माझ्या नवऱ्याची बायको या सिरीयल मधील अभिनेता देवेंद्र दोडके तसेच बल्लारपूर येथील बाल कलाकार रुचित निनावे, विरा साथीदार,सायली देठे, गजेश कांबळे यांच्या मुख्य भूमिका आहेत, तसेच सोबत रवींद्र वांढरे, भारत रंगारी,बबिता उईके, सुमेधा श्रीरामे, रवींद्र धकाते, सचिन गिरी, रोशनसिंघ बघेल अविनाश चंदणकर, गौरवकुमार पाटील, अश्विनी खोब्रागडे, अमित तिफाने शुभम उगले, समीर विरुटकर, राजू आवळे व इतर स्थानिक कलावंत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=EY_k15Js0eg&t=20s
पल्याड या मराठी फिल्मचे दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे हे मुळचे चंद्रपूर ज़िल्हातील आहेत तसेच पल्याड ही मराठी फिल्म एका समाजातील रूढी,परंपरा ज्या परंपरांना आताच्या जगामध्ये कोणी मानत नाही अश्या रूढी, परंपरांना मानणारी एका छोट्याश्या आणि गरीब कुटुंबाची कथा, ज्यात त्या एका छोट्या मुलाला शिकण्याची आवड असते पण समाजातील लोक त्याला म्हणतात कि तुला शिकण्याचा अधिकार नाही,तुझ्या बाबांनी, तुझ्या आजोबांनी जे मसानजोग्याच काम केल तेच तुला कराव लागेल अन्यथा तुला या गावामध्ये राहण्याचा अधिकार नाही. गावामध्ये जो कोणी व्यक्ती मरतो त्याला मुक्ती देणे, अंतिम संस्कार करणे, आणि त्याच दिवशी गावामध्ये भिक्षा मागणे, आणि जिथे लोकांची जेवण केलेली पात्र फेकली जातात, तिथे त्यांना बाहेर बसून जेवण दिले जाते. या चित्रपटातील कथा एका दहा वर्षाच्या मुलाची ज्याला शाळा शिकण्यासाठी गावातील लोक, पंच मंडळी, खूप बहिष्कार करण्याचा प्रयत्न करतात तरी पण तो माघार घेत नाही अशी आगळी वेगळी गोष्ट प्रेक्षका ला नक्की आवडेल तसेच या चित्रपटाची गाणे उत्तम व संगीत दर्जेदार व मधुर आहे.चित्रपटाला आत्तापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे एकूण सतरा पुरस्कार फिल्म फेस्टिवल मध्ये मिळालेले असून अनेक नामांकन मिळालेले आहेत. त्यातच अभिमानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील जगप्रसिद्ध फोर्ब्स या मॅगझीन ने पल्याड या चित्रपटा ची दखल घेतलेली आहे, म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याचे नाव अमेरिकेत सुद्धा झळकले आहे.
येणाऱ्या चार नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पल्याड हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, सर्वांनी आवर्जून बघावे, आणि आपल्या स्थानिक कलाकारांना सपोर्ट करावा अशी विनंती पल्याड फिल्म चे दिग्दर्शक शैलेश दुपारे आणि संपूर्ण पल्याड टिमने केलेली आहे.