कोरची :– पंचायत समिती कोरची अंतर्गत बेडगाव केंद्राची तिसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचिनारा येथे 23 सप्टेंबर रोज शुक्रवारला पार पडली. परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्र बेडगाव मुख्याध्यापक यशवंत लाडे, उदघाटक म्हणून बेलगाव घाट प्रशांत मेश्राम हे उपस्थित होते.
यावेळी प्रमूख अतिथी म्हणून कोसमी, भगतराम दर्रो, बेलगाव घाट पिलारे, चिलमटोला चित्ररेखा गजभिये व केंद्राचे केंद्रप्रमूख मंदा आवारी हे होते.
शैक्षणिक साहित्याचा वापर केल्याने विद्यार्थांया मध्ये कुतूहल वाढेल. विद्यार्थी अध्ययनाकडे जास्त लक्ष केंद्रित करतील व परिणामस्वरुप त्यांना लवकर आकलन होईल. शिक्षकांनी फुलोरा उपक्रम अंतर्गत शैक्षणिक साहित्याचा वापर करुन विद्यार्थ्यांचे गटानुसार अध्यापन करावे व शिक्षकांनी कर्तव्य निष्ठ रहावे असे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभूर्णे यांनी केले. फुलोरा उपक्रमाचे सुलभक विनोद भजने, सुभाष गहाणे, दिलीप नाकाडे यानी फुलोरा टप्पा- 3 झालेल्या बेसलाईन टेस्ट बाबत चर्चा करुन तिन्ही टप्यातील सर्व शाळा ‘प्रारंभिक मुक्त शाळा’ हा उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून अध्यापन करावे असे मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण व मार्गदर्शन बेडगाव मु.अ. यशवंत लाडे, विद्याप्रवेश पूस्तिका, मातापालक गटा बाबत मार्गदर्शन प्रकाश चिलबुले, स्वच्छता व परसबागेची माहीती किशोर पिलारे, दिव्यांग समावेशित शिक्षण व शिष्यवृती युवराज मोहनकर यांनी केले तर विविध प्रशासकीय माहिती या शिक्षण परिषदेचे संयोजक मंदा आवारी केंद्रप्रमूख बेडगाव यानी केले.
प्रास्ताविक मंदा आवारी तर सूत्रसंचालन लोकचंद जमदाळ यानी केले तर आभार प्रकाश चिलबुले यानी मानले. शिक्षण परिषद यशस्वीपणे पार पाडाण्यासाठी वसंत भैसारे, हीरासिंग बोगा, गौरव कावळे तसेच केंद्रातील सर्व मु.अ.व शिक्षकांनी सहकार्य केले.