कोरची :- तालुक्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रातील विद्यार्थी शासकीय आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्य व गुणांनी उच्चांक गाठून आपला विकास साधावा असे कोरची पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर यांनी गुरुवारी शासकीय आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात प्रतिपादन केले.
आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची या संस्थेतील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर व शासकीय आश्रम शाळा प्राचार्य यु यु ढोक यांनी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित व माल्यार्पण करून उद्घाटन केले.या दिक्षांत कार्यक्रमाचे अध्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक चेतन एम मांडवकर प्रमुख अतिथी शासकीय आश्रम शाळेचे विशाल गेडाम व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले यानंतर पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर व प्राचार्य यु यु ढोक यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र वाटप केले. यानंतर प्राचार्य ढोक यांनी मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थ्यांनी मेहनत करून चांगले कौशल्य प्राप्त करावे तिच्यामुळे परिवारा बरोबरच समाज राज्य व देशाची प्रगती होईल भारत हा तरुणांचा देश असल्यामुळे आपल्यासारख्या तरुणांनी संस्थेतील गुरु जणांकडून जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपले विकास साधावे. सर्वसामान्य जनतेला आपल्या कुशल कौशल्यामुळे लाभ होईल आपण ज्या परिसरात रात्र परिसर स्वच्छ ठेवून निर्माण होणारा विषारी कीटकापासून संरक्षण प्राप्त करून घ्यावे अशा प्रकारचे स्वच्छतेचे महत्त्व ही प्रशिक्षकांना पटवून दिले.
दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक करुणा बडोले यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी बनपूरकर यांनी केले व दीक्षांत समारंभाच्या समारोप करण्यात आला. दीक्षांत समारंभ यशस्वी करण्यासाठी निलेश मेश्राम, संदीप सलाम, कुमारी पल्लवी बनपुरकर संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी मेहनत घेऊन दीक्षांत समारंभ यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.