वर्धा – न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा येथील समाजकार्य विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांकडून क्षेत्रकार्या अंतर्गत समाजकार्य विभागाचे प्रा. डॉ. निशांत चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागसेन नगर परिसरात वृक्षारोपण करुण झाडांचे महत्व विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना समजावून सांगण्यात आले.
यावेळी समाजकार्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप गिरडे व आंगनवाड़ी सेविका जयतुला थूल यांची प्रमुख उपस्थिति होती. झाडे लावणे व झाडांचे संवर्धन करने ही काळाची गरज असून प्रत्येक माणसाला जीवंत राहण्यासाठी ऑक्सीजनची गरज असते आणि ते झाडांपासुनच मिळते. म्हणून प्रत्येकांनी आपली नैतिक जबाबदारी समजून झाडे लावने काळाची गरज आहे असे प्रतिपादन विभागाचे प्रा. डॉ. निशांत चिकाटे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले समाजकार्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदिप गिरडे यांनी झाडांपासून आपल्याला ऑक्सीजनच मिळत नाही तर शुद्ध हवा, फळे, फुले व सावली सुद्धा मिळते त्यामुळे झाडे लावून त्याची प्रत्येकांनी निगा राखावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकार्य विभागाची विद्यार्थिनी शिल्पा लोखंडे, सूत्रसंचालन स्वाती कडू तर आभारप्रदर्शन सागर मरसकोल्हे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.