गोंडपिपरी- सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू झाल्याने चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावरून खनिज वाहतुकीसाठी गोंडपिपरी वरून दररोज शेकडो हायवा ट्रक ची वाहतूक सुरू आहे.मात्र वाहनचालकांचे वाहनावर कोणतेच नियंत्रण नसल्याने दिवसेंगणिक अपघातात वाढ होत आहे. सुरजागड लोकप्रकल्पाने परिसरातील हजारो लोकांचे कल्याण होईल, अशी अपेक्षा होती. पण आता हाच प्रकल्प नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. अनियंत्रित वाहतूक, नशेखोर वाहनचालक, अन् प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे. सुरजागड प्रकल्पाने गोंडपिपरी तालुक्यातील अनेक तरुणांच्या वाट्याला अपंगत्व आणलेय. अनेकांची घर फुटली. मार्गावरील निवास्यांना कमालीची भिती आहे. गोंडपिपरीवरून बायपास काढावा, नशेखोर वाहनचालकांची तपासणी करावी,वाहनचालकांचा परवाना तपासावा,ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या कार्यवाया कराव्या,नवेगाव (वाघाडे) टोल नाका लवकरात लवकर सुरू करावा,कंपनी मार्फत रस्त्यावर खाजगी सुरक्षा रक्षक देण्यात यावे,वर्दळीच्या ठिकाणी पोलीस ब्यारिकेट्स लावावे,ओवरलोड वाहतूक बंद करावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि.(२३) शुक्रवारी गांधी चौक गोंडपिपरी येथे ११.३० वाजता एक तासासाठी वाहतूक आंदोलकांनी अडवून धरली होती.त्यांनंतर तहसीलदार के डी मेश्राम, ठाणेदार जीवन राजगुरू यांना निवेदन देण्यात आले १५ दिवसात मागण्या संदर्भात पाच कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना,भाजपा,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,वंचीत बहुजन आघाडी,व्यापारी संघटना, धर्मवीर प्रतिष्टान,बौद्ध महासभा,जय मातादी क्रिडा मंडळ व नागरिकांतर्फे प्रशासनाला दिला आहे. .