चंद्रपूर: प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर रोजी त्यांना ८८ वर्षाचे आयुष्य लाभले त्यांनी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतुन महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली व त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख मिळाली.प्रबोधनकारांनी सतिप्रथा,सतीप्रथा,बालविवाह,
अंधश्रध्दा अनिष्ट प्रथा या विरोधात आयुष्य भर प्रहार केला,शिक्षण,प्रबोधन,शेतकरी,कामगारांनासाठी अनेक आंदोलने केली महाराष्ट्राचे हित व लोक हित यामध्ये कधीही तडजोड केली नाही,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला,महाराष्ट्र धर्म,मराठी माणसासाठी अहोरात्र कार्य करत त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सतत कृतीशिल विचार व कृती करत राहीले. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने प्रबोधनकारांच्या विचाराला व ईतरही गौत्तम बुद्ध ते जिजाऊ, शिवराय, फुले, शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विचाराचा जागर व्हावा. असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले की, प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर “लोक प्रबोधन दिन” म्हणुन साजरा करण्यात आला पाहिजे. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती व गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली सिनेट सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड विनोद थेरे , उदघाटक शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे.सत्कारमुर्ती- प्रा.डाॅ.दिलीप चौधरी सिनेट सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र,प्रा.निलेश बेलखेडे सिनेट सदस्य तथा युवा सेना प्रमुख चंद्रपूर.
प्रमुख उपस्थिती -चंद्रकांत वैद्य,प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सुरेश पचारे,महानगर अध्यक्ष तथा नगर सेवक शिवसेना,कुसुम उदार,मा.जिल्हा संघटिका शिवसेना,पुष्पा मालेकर,सरपंच शेणगाव,निलीमा इंगोले उपसरपंच मांगली(दे),अॅड.मनिष काळे महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,चंद्रपूर,यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर प्रा.डाॅ.दिलीप चौधरी,संदिप गिर्हे,विनोद थेरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन-चंद्रशेखर झाडे,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,चंद्रपूर.
प्रास्ताविक-इंजी.चेतन पावडे विभागीय सचिव संभाजी ब्रिगेड.
आभार प्रदर्शन-रोहित चुटे यांनी केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गोमदेव थेरे,संतोष भोयर,संजय बोटरे,प्रकाश पिंपळकर,राजु ढेंगळे,दिपक खारकर,बाळा बोढे,प्रतिक वाटेकर,संदिप मोरे,संकेत चौधरी,निखील वडस्कर,मोहित सोरते,आमिर अहमद,मोरुभाऊ चटप,पंकज चटप,विनोद निमकर,प्रमोद मासिरकर,दादाजी सपाट,मंगेश चटकी यांनी अथक प्रयत्न केले,या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.