गोंडपिपरी(सुरज माडुरवार) : तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू असून ती तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीला घेऊन विठ्ठलवाडा येथील महिलांनी तंटामुक्त समिती,ग्रामपंचायत कमिटी संयुक्तरित्या पोलीस स्टेशनला धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार राजगुरू यांना निवेदन दिले .
राजकीय,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात नावाजलेला गाव. या गावाची ओळख सधन शेतकऱ्याचे गाव म्हणून तालुक्यात ओळखल्या जाते.शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नातूनच आपली उपजीविका करून अगदी गुण्या गोविंदाने सर्व नांदतात.मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी जेव्हापासून उठली तेव्हा पासून गावात अवैध दारूविक्री मुळे शांतता भंग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गावातीलच काही व्यक्ती हा अवैध दारूविक्री धंदा करीत असून सुखाने नांदणारे संसार आज घडीला उघड्यावर आले आहेत,याचा त्रास हा महिलांना सहन करावा लागत असल्याने गावातील अनेक बचत गटाचे ग्राम सेवा संघ व त्यामध्ये समाविष्ठ असलेली अनेक महिला बचत गटाच्या महिला,ग्राम पं कमिटी पदाधिकारी एकत्र येत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मागणीचे निवेदन जीवन राजगुरू यांना दिले.यावेळी तं.मु.स अध्यक्ष गणेश कोवे,पोलीस पाटील शारदा पिंपलकर ,सरपंच अंकुर मलेलवार ,ग्रा.पं सदस्य दर्शना दुर्गे,विलास लोणारे, बेबी शेडमाके, दीपा ताजने यांचे सह शेकडो महिलांची उपस्तीती होती.
ठाणेदार जीवन राजगुरू
विठ्ठलवाड्यात अनेकदा अवैद्य दारू विक्रीच्या कारवाया केल्या आहेत.महिलांची तक्रार प्राप्त झाली असून अवैध दारूविक्री वर नक्कीच प्रतिबंध लावू