कोरची :- येथील रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळाची आरमोरी विधानसभा आमदार कृष्णाजी गजभे यांना आपल्या विकासनिधीमधून कोरचीत बौद्ध समाजासाठी सभागृह ईमारत बांधकाम करिता आर्थिक सहाय्यता मदत करावी म्हणून रविवारी निवेदन देण्यात आले.
कोरची शहरातील बौद्ध समाजाची वार्ड क्रमांक १२ मध्ये २९५ सर्व्हे नंबरची एक आर जागा उपलब्ध आहे ही जागा रमाई मंडळाच्या नावे असून कोरची रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळ धर्मदाय आयुक्त यांचे नोंदणीकृत आहे. परंतु या ठिकाणी समाजाचे कुठलेही सभागृह नाही त्यामुळे आरमोरी विधानसभा आमदारांना आपल्या विकासनिधीमधून सभागृह इमारत बांधकामासाठी आर्थिक सहायता करावी अशी मागणी केली आहे.
आमदार कृष्णा गजबे यांनी आमदार विकास निधीतून दहा लाख रुपये मदत करणार असल्याचे आश्वासन दिले असून आणखी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे समाजाकरिता विकास निधी मिळत असल्यास ती निधी आणण्यास मदत करणार असेही सांगितले. निवेदन देताना कोरची रमाई बहुद्देशीय सामाजिक महिला मंडळाचे अध्यक्ष ज्योती भैसारे, सचिव छाया साखरे, जया सहारे, शोभा साखरे, सुमित्रा भैसारे व बौद्ध समाजाचे पदाधिकारी जीवन भैसारे, गिरधारी जांभुळे उपस्थित होते.