गोंडपिपरी (सुरज माडुरवार) : शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरात दिवसांगणित वाढत असलेली वर्दळ पाहता नगरपंचायत प्रशासनाने बहुप्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील नालीवरील दुकाने ,बांधकाम ,सेड हटवून जनतेसाठी फुटपाथ खुला करून देण्यासाठी अतिक्रमण धारकांवर कार्यवाहीचा बडगा उभारला आहे. तहसीलदार तथा मुख्याधिकारी के.डी मेश्राम यांनी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण धारकांवर हातोडा चालविला आहे. आज सकाळपासूनच प्रशासनाची टीम शहराच्या मुख्य मार्गावर फौज फाट्यासह दाखल झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठ्या बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . यावेळी ठाणेदार जीवन राजगुरू,पीएसआय धर्मराज पटले,बांधकाम सभापती सुरेश चिलनकर,नगरसेवक सुनील संकुलवार,पाणीपुरवठा सभापती सचिन चिंतावार,महेंद्रसिंह चंदेल,नगर पंचायत कार्यालयीन अधिक्षक बेग,शीतल वनकर यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचारी फौज फाट्यासह उपस्थित होते.दरम्यान शहरातील अतिक्रमण साफ होऊन वर्दळ आणि दाटीवाटीच्या समस्येतून मार्ग निघताना दिसून आला