गडचिरोली:- ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी रक्ताच्या कर्करोगावर मात करून तब्बल तीन महिन्यांनी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी स्वगृही पोहोचल्याने भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पात त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना वयाच्या 74 व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाच्या सामना करावा लागला. 6 जून पासून डॉ प्रकाश आमटे लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथून बाहेर पडले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती साथ देत नसली तरीही या आजाराला सकारात्मकरीत्या तोंड देऊन त्यांनी या निदानावर मात केले.नुकतेच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आले. आज 6 सप्टेंबर रोजी ते गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात असलेल्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पात पोहोचले.
6 जून ते 6 सप्टेंबर असे तीन महिने ते लोक बिरादरी प्रकल्पाच्या बाहेर होते. अखेर त्यांचा लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील कर्मभूमीवर आगमन होताच शाळेतील शाळेतील शिक्षक,कार्यकर्ते आणि तब्बल 650 विद्यार्थ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
————————————————–
रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात करून 3 महिन्यांनी बाबा सुखरूप पोहोचले. संध्याकाळी 4.30 वाजता लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे शाळेचे 650 विद्यार्थी, शिक्षक, सर्व कार्यकर्ते आतुरतेने वाट बघत होते.बाबा घरी पोहोचताच त्यांचे स्वागत करण्यात आले.
बाबांना प्रवासाचा थकवा जाणवत आहे.पण कर्मभूमी मध्ये आल्याने आनंद झाला आहे.दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टर आणि स्टाफ यांचे खूप-खूप आभार.
-अनिकेत आमटे, संचालक लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा