वर्धा (प्रशांत अवचट ) :- जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टि तसेच पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरघोस मदत देण्याची मागणी हिंगणघाट-समुद्रपुर,सिन्दी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी नुकतीच पावसाळी अधिवेशनाचेवेळी सभागृहात केली.
यावेळी त्यांनी मागीलवर्षी महाविकास आघाडीचे सरकारने त्यांचे शासन असतांना शेतकऱ्यांना कुठलीही मदत केली नसल्याची आठवण करुन देत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टिचेवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पुरग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केल्याबद्दल तसेच प्रत्येक कुटुंबियास ५ हजार रुपये खावटी दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांचे आभार मानले.
राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टि झाली, जिल्ह्यातसुद्धा सतत ३ मुसळधार पाऊस झाला, हिंगणघाट विधानसभा जवळपास १५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविन्यात आले होते.
राष्ट्रपती निवडणूकीचे निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी मुंबई येथे असतांना मूसळधार पावसामुळे सर्वत्र नदीनाले उफाळून वाहु लागले,अनेकांचे घरात पुराचे पाणी शिरले, धनधान्यासह सर्वच गृहपयोगी साहित्य पाण्यात बुडाले असतांना गंभीर पुरपरिस्थितीची निर्माण झाली.आ.कुणावार यांनी सदर आपत्तीची माहिती देताच उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी रात्रीच नागपुर गाठले.
दूसरे दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस तात्काळ हिंगणघाट क्षेत्रात दौरा करीत पुरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या,अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात यावेळी मान्सून खुप उशिरा आला,पिकांची दुबार,तिबार पेरणी शेतकऱ्यांना या हंगामात करावी लागली, शेतकऱ्यांसाठी हे वर्ष नापिकीचे ठरले.
शहरी तसेच ग्रामीण भागातही अतिवृष्टि व नदीनाल्याला आलेल्या पुरामुळे घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले,अतिवृष्टिमुळे धनधान्यासह,गृहपयोगी साहित्याचे नुकसान झाले,शेतीउत्पन्नातही मोठी घट झाली , अतिवृष्टिमुळे शेती ख़रडुन गेली,विजेचे खांब वाकले,अनेक पुलं वाहून गेले,रस्तेसुद्धा ख़रडुन निघाले,अशावेळी सरकारने निकषाचे पलीकडे जाऊन शेतकऱ्यांची मदत करण्याची विधानसभेत मागणी केली.शेतकऱ्यांचे पशुधन पुरात वाहून गेले असल्याने शवविच्छेदनासाठी मृत शरीर मिळणे कठिन झाल्याने शासनाने त्याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्याचीसुद्धा मागणी त्यांनी सरकारकडे केली.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उत्कृठ काम करीत तात्काळ ४८ तासात पंचनामे करुन पुरग्रस्त नागरिकांना मदत केली असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी करुन प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
तातडीच्या मदतीची घोषणा केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तसेच उपमुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त केले.