वरोरा :-मातृभाषा म्हणजे आई ज्या भाषेत व्यक्त होते ती भाषा. गर्भावस्थेत असल्यापासूनच आई मुलाला आपल्या भावनांचा, विचारांचा आहार देत असल्यामुळे मुलाला मातृभाषा परिचित असते यामुळे मुलाला मातृभाषेतून शिकताना सर्व विषय सुलभ जातात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम होतो . आज पालकांचा मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून पालकांनी मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे असे मत शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सारिका सावसाकडे यांनी लोकमान्य प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित पालकांचे चर्चासत्र या कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केले .
वर्ग पहिला व दुसरीच्या पालकांसाठी ०५ ऑगस्ट व वर्ग तिसरा व चौथीच्या पालकांसाठी ०६ ऑगस्टला शाळेच्या सभागृहात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते . या चर्चासत्राला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज कथडे,प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष घुमे,पालक शिक्षक संघाच्या सचिव सुनीता उरकांडे , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष त्रिशूल घाटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सारिका सावसाकडे इत्यादी पाहुणे मंचावर उपस्थित होते . दोन्ही दिवसांच्या चर्चा सत्राची सुरवात सरस्वती पूजन व स्तवन गायनाने झाली . त्या नंतर पाहुण्यांचे स्वागत व या चर्चासत्राचा उद्देश विषद करण्याकरिता सुनीता उरकांडे यांनी प्रास्ताविक केले. त्या नंतर पालकांच्या चर्चा सत्राला सुरवात करण्यात आली अनेक पालकांनी चर्च द्वारे आपल्या शंकांचे निराकरण केले .पालकांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज कथडे यांनी दिले.तसेच वर्गशिक्षकांशी पालकांनी चर्चा केली. त्यांनतर प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पुढे बोलतांना सारिका सावसाकडे म्हणाल्या की प्रत्येक वयासाठी एक मानसशास्त्र असते.जसे बालकांसाठी बालमानसशास्त्र जे येथील शिक्षकांना चांगले ज्ञात आहे. त्याप्रमाणे या शाळेतील अनुभवी तज्ञ् शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा आपल्या पाल्यांना भविष्यात होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरोज कथडे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक उमेश लाभे यांनी हर घर झेंडा या उपक्रमाविषयी पालकांना माहिती दिली प्रत्येकांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरावर झेंडा फडकवावा अशी विंनती केली . त्याचे नियम अटी यांची सविस्तर माहिती ही पालकांना देण्यात आली . पहिल्या दिवशीच्या चर्चा सत्राचे संचालन शाळेतील शिक्षिका रजनी गोंडे यांनी केले तर दुसऱ्या दिवशीचे संचालन शिक्षक रामभाऊ घोरुंडे .या चर्चासत्राच्या यशस्वितेकरीता .शाळेतील शिक्षिका गीता सूर , प्रीती सोनकुरवार , लिपिक सुरेश बरडे, शिपाई अनंता आमटे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली