गोंडपिपरी :-कुठल्याही समस्येवर यशस्वीपणे मात करायची असेल आणि सर्वागिंण प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही,असे परखड मत ॲड.दिपक चटप आणि ॲड.बोधी रामटेके यांनी व्यक्त केले.ते गोंडपिपरी तालुका पत्रकार संघ आणि दिपस्तंभ अभ्यासिका द्वारा आयोजित सत्कार आणि मार्गदर्शन सोहळ्यात बोलत होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना समोचित मार्गदर्शन केले.शिक्षण हे शस्त्र आहे.आणि ते प्रत्येकांनी बाळगायला हवे.यातून यशाचा मार्ग अधोरेखित होते.आणि विशिष्ट वयात योग्य त्याच गोष्टी केल्या की जिवन अधिक समृद्ध होते.असा देखिल मौलिक सल्ला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात शेतकरी कुटूंबातील जन्मलेल्या ॲड. दिपक चटप यांना नुकतीच लंडन येथिल जागतिक प्रतिष्ठेची समजली जाणारी “चेवनिंग” शिष्यवृत्ती जाहिर झाली.पुढील शिक्षण ते लंडणमधून पूर्ण करणार आहेत.तर आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शि येथिल ॲड.बोधी रामटेके यांनी नुकतीच ईटली देशात पार पडलेल्या जागतिक परिषदेला हजेरी लावली.यात त्यांनी आदिवासींच्या प्रश्नांवर वाचा फोडली.पुण्याच्या “आयएलएस” या नामांकीत महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर जनसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी या दोनही युवा वकिलांनी सुरवात केली.यातून अनेक लोकाभूमिक विषयही मार्गी लावले.याच पाश्वभूमीवर गोंडपिपरी तालुका पत्रकार संघ आणि दिपस्तंभ अभ्यासिका द्वारा या दोनही वकिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व्यापारी तथा आर्य,वैष्य समाजाचे अध्यक्ष अजय माडूरवार,विठ्ठलवाडाचे सरपंच अंकुर मल्लेलवार,जेष्ठ पत्रकार राजकपूर भडके आदिंची उपस्थिती होती.यावेळी पत्रकार संघ आणि दिपस्तंभ अभ्यासिकाकडून या दोनही युवा वकिलांचा सत्कार करण्यात आला.सत्कारानंतर ॲड.दिपक चटप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सल्ला दिला.विद्यार्थ्यांनी रम,रमा आणि रम्मी यापासून स्वताला दूर ठेवले पाहिजे.आणि जिद्द,परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यश पदरी पाडले पाहिजे.परदेशात उच्च शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.तेव्हा नियमित अभ्यास करा.सातत्य आणि संय्यम ठेवा.यशस्वी झाल्यानंतर देखिल जमिनीवर पाय ठेवून समाजातील शोषित,वंचित घटकांकरिता काम केले पाहिजे,हा आशावादही व्यक्त केला.तर ॲड.बोधी रामटेके यांनी ईच्छा असली की मार्ग सापडतात,तेव्हा परिस्थितीचा बाऊ न करता,धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.अपयशाने खचून जाऊ नका,असे देखिल रामटेके यांनी सांगितले.यावेळी जेष्ठ पत्रकार संदीप रायपूरे,समीर निमगडे,दिपक वांढरे,नितेश डोंगरे,सुरज माडूरवार,प्रसेनजीत डोंगरे,प्रमोद दुर्गे,हर्ष महेशकर,ईतीहास मेश्राम यांच्यासह दिपस्तंभ अभ्यासिकेचे निखिल खोब्रागडे,प्रफुल वाळके,विखिल खोब्रागडे आदिसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सदस्य राजू झाडे यांनी तर संचालन व आभार दिपस्तंभच्या नितेश चूनारकर यांनी माणले.