चंद्रपूर :- जंगल व जंगली प्राण्यांचे संवर्धन करत असतांना याची मोठी किंमतीही आम्हाला चुकवावी लागत आहे. ताडोबा TADOBA अभयारण्य जगप्रसिध्द आहे. येथील वाघांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र याच जंगलातून प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने मानव व वन्यजीव संघर्ष Human and wildlife conflict वाढला आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढत असतांना मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केंद्रानेही पूढाकार घेत उपाययोजना करत आमच्यासाठी वाघ श्राप नाही तर वरदान ठरेल असे नियोजन करावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यावरन वने आणि हवामान बदल केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव,केंद्रीय राज्यमंत्री अश्वीनीकुमार चौबे Minister of यांची भेट घेत केली आहे.
जागतीक व्याघ्र दिनानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या वतीने वन प्रबोधनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यावरण, वने आणि हवामान बदल केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्वीनीकुमार चौबे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीयमंत्री यांची भेट घेत सदर मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यावर निर्सगाची नेहमी कृपा राहिली आहे. हा जिल्हा वन संपत्तीने संपन्न जिल्हा आहे. येथील वनांचे संरक्षण स्थानिक नागरिकांनी केले आहे. त्यामुळे येथील वनसंपत्ती कायम राहिली आहे. चंद्रपूरातील जंगलाची वाघांचे जंगल म्हणुन जगात ओळख आहे. येथील वाघांची संख्या आणखी वाढत आहे. मात्र याचे काही वाईट परिणामही आम्हाला सोसावे लागत आहे. जंगली हिंसक प्राणी नागरी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने जिल्हात मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढला आहे. वाघांचे संवर्धन करणे हे योग्यच आहे. मात्र मानवांचेही संरक्षण करणे ही, ही आपली जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातुन आम्ही या दिशेने प्रयत्न करत आहोत मात्र आता केंद्रानेही यात मतद करणे अपेक्षित असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असुन जंगलालगत सुरक्षा भिंत बांधण्यात यावी यासह इतर उपायोजनांसाठी केंद्राने मदत करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यावरण, वने आणि हवामान बदल केंद्रीय भुपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्वीनीकुमार चौबे यांना केली आहे.