कोरची:- पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती Police Help Center Gyarapatti चे वतीने २४ जुलै २०२२ रोजी “भव्य कृषी मेळावा” (Grand Agricultural Fair)आयोजित करण्यात आलेला होता. सदर मेळाव्याचे उद्घाटक मोहन कुरचामी, उपसरपंच ग्रा.पं. पिटेसुर, प्रमुख अतिथी तोनसिंग सर असिस्टंट कमांडंट सिआरपीएफ(CRPF) ११३ बटालियन कॅम्प ग्यारापत्ती, हिमालय रावटे, कृषी सहा. अधिकारी कोरची, खोब्रागडे , शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ग्यारापत्ती निकेश परतवार, स्टेट बँक(State Bank) धानोरा व पोमके. हद्दीतील संपुर्ण गावातील गावपाटील तसेच प्रतिष्ठीत नागरीक यांचे समक्ष मेळाव्याची सुरवात करण्यात आली.
सदर मेळाव्यादरम्यान एकुण ०५ स्टॉल लावण्यात आलेले होते. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरची यांचे वतीने हिमालय रावटे सा, कृषी सहा. अधिकारी यांनी सेंद्रीय शेती, रासायनिक शेती विषयक मार्गदर्शन करुन कृषी विषय शासकीय विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्टेट बँक शाखा धानोरा यांचेकडुन शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना, विमा योजना बाबत स्टॉलच्या माध्यमाने सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गुरुदेव कृषी केंद्र, वर्धा ता.कुरखेडा तर्फे स्टॉल च्या माध्यमातुन विविध जातीचे बि-बियांचे प्रदर्शन व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भारत गॅस एजन्सी कोटगुल यांचे मार्फतीने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत ३१ गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ग्यारापत्ती तर्फे एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथील विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस विभागातर्फे मेळाव्यामध्ये उपस्थित शेतकरी बांधवांना शेतीस उपयोगी साहीत्य स्प्रे पंप २०, कुदळ ३०, फावडे ५०, विळे ६० घमेले ३० तसेच बि-बियाणे- धान, ज्वारी, चवळी, पालक, मेथी, भेंडी, कारली, वाल, टमाटर इत्यादी मोफत बियानांचे वाटप करण्यात आले. तसचे स्टालचे माध्यमातुन सातबारा २०, पॅन कार्ड- ४, ईश्रम कार्ड- १० मोफत काढुन देण्यात आले. तसेच मेळाव्यादरम्यान उपस्थित परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना नोट बुक व पेन वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यादरम्यान प्रभारी अधिकारी शिवाजी पोफळे यांनी उपस्थित स्त्रिया व पुरूषांना पोलीस दादालोरा खिडकी चे विविध योजनांची माहिती देवुन विविध योजनांचा लाभ घेणेबात आव्हान केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोउपनि कैलास माळी यांनी केले तर पोउपनि नरेश वाडेवाले यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व नागरीक यांचे आभार मानले. सदर कृषी मेळाव्याला पोमके. हद्दीतील ३०० ते ३५० स्त्रिया, पुरुष तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आलेली होती. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू न देता यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास जि.पो. अंमलदार, एसआरपीएफचे अंमलदार, तसेच सिआरपीएफ अंमलदार यांनी सहकार्य केले.