कोरची :- मासाहेब अनुदानित आदिवासी आश्रम शाळा कोटरा येथे सोमवारी आपल्या भारताचे पंधराव्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची माहिती येथील विद्यार्थ्यांना टीव्ही वरून प्रत्यक्ष दाखवून शाळेतील विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक सुनील अवसरे, प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे, माध्यमिक शिक्षक सुधाकर कांबळी, अरविंद काशीवार, नमो मेश्राम, प्राथमिक शिक्षक रमेश नांने, रमेश सहारे, देवानंद पुरांकर, खिरेश ढवळे, तसेच राकेश कुळसंगे, सुशील मस्के, नीतीन पीत्तूलवार, राजू चौधरी तसेच बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
रमेश नांणें यांनी नवनियुक्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या बाबत संपूर्ण जीवनाविषयी तसेच राष्ट्रपती च्या निवडणूक प्रक्रिया विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण विद्यार्थी तथा कर्मचाऱ्यांना टीव्हीवरील राष्ट्रपतीच्या शपथविधीचा सोहळा दाखविण्यात आला. तसेच दोन्ही मुख्याध्यापकांनी आपल्या भारताच्या इतिहासात प्रथमताच आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या बद्दल आदिवासी समाजाचे भूषण असल्याचे सांगितले.