कुरुल : गेली चार पाच वर्षे आपल्यासाठी अडचणीची गेली. मात्र आता निसर्गाने साथ दिली असल्याने भिमाची विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसु लागली आहे. सुदैवाने भाजपच्या नेतृत्वाने खासदार धनंजय महाडिक यांना मोठी ताकद दिली आहे . या परिस्थितीत आम्हाला भीमा साखर कारखाना निवडणुकीची अजिबात भीती वाटत नाही . आमचे सगळे लक्ष येणाऱ्या गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक गाळप करण्याचे आणि सर्वाधिक दर देण्याकडे आहे . यासाठी यापुढील काळात माझ्यासह संचालक मंडळाचा ऊस तोडणी प्रोग्रॅम मध्ये हस्तक्षेप असणार नाही. याची ग्वाही देत आता फक्त सभासदांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. असे प्रतिपादन भीमा परिवाराचे युवा नेते विश्वराज महाडिक यांनी केले .
भीमा साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला असला तरी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांच्या गाठीभेटी साठी युवा नेते विश्वराज महाडिक यांनी गावभेट दौरा आयोजित केला आहे . दि .२८ रोजी सकाळी वडवळ , गोटेवाडी, कुरुल, अंकोली येथे आयोजित शेतकरी बैठकीत ते बोलत होते . यावेळी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, संचालक चंद्रसेन जाधव, शिवाजीराव गुंड, बाबुराव पाटील,सुनिल चव्हाण, छगन पवार,अण्णासाहेब पाटील, लिंगेश्वर निकम, प्रा.संग्राम चव्हाण,प्रा.ज्ञानेश्वर जाधव, संभाजी कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी महाडिक यांचा ग्रामस्थांच्या वतीने संचालक बापूसाहेब जाधव व किसनदेव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना महाडिक म्हणाले की, खासदार धनंजय महाडिक यांनी दहा वर्षांपूर्वी दिलेले कारखाना विस्तारीकरण आणि सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले आहेत . पुढील हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालू होईल. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी सुरू आहे .
या दौऱ्यात माझ्याकडे सर्वाधिक तक्रारी या शेती खात्याबद्दल आल्या आहेत .त्यामध्ये निश्चितच सुधारणा होईल अशी ग्वाही देत महाडिक यांनी पुढील काळात प्रोग्राम प्रमाणे ऊस तोडणी होईल, कुठल्याही परिस्थितीत ऊस पेटवून आणण्याची वेळ येणार नाही. आणि ऊसतोडणी कार्यक्रमात माझ्यासह संचालक मंडळ कसलाही हस्तक्षेप करणार नाही असा विश्वास व्यक्त केला. चालू वर्षी शेतकऱ्यांचा गळीतास आलेल्या उसाचे बिल उशीर न लावता लवकरच जमा करणार असल्याचं महाडिक म्हणाले.
यावेळी भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग ताटे, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, बाबुराव पाटील, प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रसेन बापू जाधव, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विनोद आंबरे, महाराष्ट्र राज्य क्रीडाअध्यक्ष अण्णासाहेब पाटील, गहिनीनाथ जाधव, टी.डी. पाटील ,बाबुराव पाटील, धनाजी माळी, पांडुरंग माळी,बाळासाहेब लांडे,आनंद जाधव,भारत जाधव, विकास जाधव,मधुकर जाधव,बाळासाहेब जाधव,
किसनदेव जाधव, रावसाहेब जाधव,संजय कुलकर्णी, धनाजी जाधव,गुरुनाथ पाटील, समाधान जाधव,अब्दुलहमीद बागवान,चंदू पाटील,राजाराम बाबर, भारत पाटील, किसन जाधव,झाकीर मुलाणी,तानाजी पाटील, अभिजित गवळी,सुनील आंबरे, अंकोली येथे सज्जनराव पवार,अशोक क्षीरसागर,अंबादास भोसले, नानासाहेब पवार,पप्पू पाटील,माऊली भगरे, दीपक पवार, अजिंक्य क्षीरसागर, पत्रकार बंधू महेश कुलकर्णी व सुहास घोडके आदिंसह सभासद व कुरुल ग्रामस्थ उपस्थित होते . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पांडुरंग ताटे यांनी केले .