कोरची :- २७ जुलैला पारबताबाई विद्यालय कोरची येथे २१ ऑगष्ट ला होऊ घातलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व विमाशिसंचे नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवारसुधाकर अडबाले यांचे अध्यक्षतेत सहविचार सभा आयोजीत करण्यात आली. यंग टिचर्स असोशिएशन,नुटा,विमाशीसं,विज्युक्टाएम.सी.व्ही.सी.या समविचारी शिक्षक संघटनानी एकत्रीतपणे शिक्षक महाआघाडीच्या बॅनरवर निवडणूक लढण्याचे ठरविण्यात आले.
सदर सभेला बौध्द महासभा संस्था अध्यक्ष रामदास साखरे ,शाळेचे मुख्याध्यापक शलिकराम कराडे ,विमाशी संघ गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष दतात्रेय खरवडे ,गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकीच्या उमेदवार अजय लोंढे ,कवाडकर , संजय दोनाडकर प्राध्यापक वनश्री महाविद्यालय कोरची, प्रा. रोटके वनश्री महाविद्यालय तसेच कोरची तालुक्यातील खाजगी शाळेतील शिक्षक आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठ पदविधर मतदार संघाची निवडणूक, समविचारी संघटनांनी एकत्र येवून शिक्षक महाआघाडीच्या बॅनरवर विमाशिसंचे सरकार्यवाह अडबाले यांचे नेतृत्वात लढवायचे असे ठरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संचालन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष नामदेव नागपुरे तर आभार गणेश मुंगीलमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज हेमके ,अजय पुल्लरवार ,राजेंद्र मस्के ,तुळशीराम कराडे ,जीवन भैसारे , पांढुरंग नागपुरे , बिसेन , मुन्शीलाल अंबादे ,सुरेश जमकातन पराग खरवडे तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.