कोरची :- तालुक्यात खरीप हंगामात मुख्यतः धान पिकाची लागवड केली जाते. सध्या परिस्थित रोपांची पूर्ण लागवड सर्वत्र सुरु आहे. अशातच ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस असुन गादमाशी कीड़ी करीता अनुकूल ठरत आहे गादमाशी खोद कीड़ा यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्या करीता पन्हे अवस्थेत प्रतिबंधात्मक उपाय योजन करुण कीडी चे व्यवस्थापन करण्याचे आवाहन तालुका कृषि विभागाने केले आहे. टेंमली व बेतकाठी येथे शेतकऱ्यांचे शेतावर किड व्यवस्थापणा चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शक म्हणून बोधिकर शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र गडचिरोली तालुका कृषि अधिकारी कु. व्ही. एस. मांडलिक मंडल कृषि अधिकारी एल. के. कटरे कृषि पर्यवेक्षक डी.जे. मसराम, कृषि सहाय्यक जमकातन,सहा रेखा पुळी, व शेतकरी उपस्थित होते या दरम्यान मार्गदर्शन करताना पिक पन्हे अवस्थेत असताना मेटॅरिझियम ॲनिसोप्ली व बिवेरिया बॅसियाना बुरशिचा वापर हेक्टरी २ किलो फवारणी करीता करावा त्यानतंर दूसरी फवारणी ऑगष्ट सप्टेम्बर दरम्यान करावी. अळी व प्रौढ़ दोन्ही अवस्थावर प्रभाविपणे नियंत्रण करतात. तसेच गराडीची पाने १.५० टन प्रति हेक्टरी या प्रमाणात चिखलनिचे वेळी शेतात टाकावीत त्यामुळे तुडतुडे खोडकिडयांचा प्रदुर्भाव सुद्धा कमी होतो. असे बोथीकर यांनी सांगितले.
मागील वर्षी तालुक्यात ब-याच ठिकाणी गादमाशी चा प्रादुर्भाव दिसून आला गादमाशी हातोहात धान नष्ट करणारी अतिश्य घातक किड आहे. गादमाशी ही लांब पायची तपकिरी रंगाची आणि विशिष्ट प्रकारचा उपवास सोडनारी डासा सारखी दिसणारी किड आहे. गादमाशीची अळी प्रथम धानाच्या मुख्य खोडात शिरून तिथे स्थिरावते. वादना या कोंबामध्ये जावुन पानाच्या खालच्या भागाची नळी किंवा पाँगा तयार करते. यालाच सिल्व्हर शुट म्हणतात. रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास अनेक फुटवे फुटतात परिणामी रोपांची वाढ खुटते.
गादमाशिचे पौले आणि प्रौढ या दोन्ही अवस्था धानपिकावर जबरदस्त आक्रमण करतात. पिकाना अंकुर फुटण्याच्या स्थितीत गादमाशी रोपांच्या खोडात शिरून त्यामध्ये असलेले अंकुर कतरून रस शोषून घेतात रोपाना खुरटे बनुन टाकतात. दाणे कुरडताना गादमाशीने सोडलेल्या लाळे मुळे रिकाम्या अंकुराच्या ठीकाणी तपकिरी रंगाचे डाग तयार होऊ शकतात त्यामुळे संपूर्ण पिंकाचे उत्पादन सुमारे ३० टक्क्याने कमी होण्याचा धोका संभवतो. गादमाशी च्या नियंत्रणा करीता गाद प्रतिकारक जातीचा ( PKU गणेश, PDKU किसान साकोली ८, सिंदेवाही २००१, सुरक्षा ) वापर करावा व्यवस्थापना करीता किड ग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत.
गादमाशी प्रवण क्षेत्रात रोवनी नंतर १० दिवसानी व ३० दिवसानी इतर क्षेत्रात ५ टक्के चंदेरी पाँगे इतका प्रदुर्भाव आढळताच दाणेदार कार्बोफ्युरॉन 3 जी २५ कीलो ग्राम अथवा दाणेदार क्विनॉलफॉस ५% १५ किलो प्रति हेक्टरी बाधी मध्ये ७ ते १० सेमी (३ ते ४ इंच ) पानी असताना टाकावे बांधितिल पाणी ४ दिवसा पर्यंत बांधी बाहेर काढू नये खोडकीड़ा नियंत्रना करीता रोवनी पूर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही १० मि प्रति १० ली पाण्याच्या प्रमाणात तयार केलेल्या मिश्रनात १२ तास बुडून ठेवावे व नंतर रोवनी करावी सध्याचे वातावरण अनुकूल असल्यामुळे धानपिकावर किडीचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता आहे. परंतु पिक पन्हे अवस्थेत असताना आणि प्राथमिक अवस्थेत असताना विद्यापिठाच्या शिफारशी नुसार वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करून व्यवस्थापन केले तर उत्पादनात घट होण्याचा धोका राहणार नाही त्यामुळे शेतक-यांची धानपिक रोप आणि रोवनी केलेल्या पिकाचे निरिक्षण करून किडीचे व्यवस्थापन करावे.