माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार.
मुल :- शहरात अतिवृष्टीमुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले अश्या ८०० घरांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रत्येकी ५ हजार रू. चे धनादेश दि. ३० जुलै रोजी संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने ४० लक्ष रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत तातडीने दखल घेत केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
मुल शहरात अतिवृष्टीमुळे सुमारे ८०० घरांमध्ये पाणी शिरून मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांची पडझड सुध्दा झाली. याची तातडीने दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश देत नुकसान भरपाई देण्याबाबत अवगत केले. याबाबत त्यांनी मा. मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली व चर्चा केली. यासंदर्भात झूम प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत देखील आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले.
अतिवृष्टीदरम्यान नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले असताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चमू पाठवून जीवनावश्यक वस्तुंच्या किट्स देखील त्यांनी वितरीत केल्या. पुरग्रस्तांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांना भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन धीर दिला. या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर ८०० नुकसानग्रस्त घर धारकांना प्रत्येकी ५ हजार रूपये मदत तातडीने मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुरग्रस्तांच्या वेदना जाणून घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार व पुरग्रस्तांसाठी मंजूर केलेली नुकसान भरपाई मुल शहरात कौतुकाचा विषय ठरली आहे. ज्या घरांची पडझड झाली आहे अश्यांना देखील लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार प्रयत्नशील आहे.
Compensation of 5 thousand rupees each to 800 elders of Mul city.
Checks will be distributed to the flood victims on July 30
Former Finance Minister A. Initiative of Sudhir Mungantiwar.
Mul :- 5,000 each as compensation for the damage caused to 800 houses which were damaged due to heavy rain in Mul city. Check dt. It will be distributed to the concerned on 30th July. A grant of 40 lakh rupees has been distributed immediately for this purpose. Former Finance Minister A. Sudhir Mungantiwar’s efforts to take immediate notice of this have been successful.
Around 800 houses were damaged due to heavy rains in Mul city. Many houses collapsed. We are taking immediate notice of this. Sudhir Mungantiwar informed District Magistrate Chandrapur to make quick Panchnama and give compensation. In this regard, he said Hon. Also met and discussed with the Chief Minister. In this regard also attend the meeting held through Zoom system. Sudhir Mungantiwar gave strict instructions to the administration.
He also distributed kits of essential items by sending teams of BJP office bearers and activists when the houses of citizens were damaged due to water entering during heavy rains. They were encouraged by BJP workers saying that they stand firmly behind the elders. In the background of this loss, the 800 damaged house owners have got a big relief as they will get immediate assistance of Rs 5 thousand each. Come knowing the pain of the elders. The initiative taken by Sudhir Mungantiwar and the compensation granted to the veterans has been appreciated in the city. Come to get compensation soon for those whose houses have collapsed. Sudhir Mungantiwar is trying.