गडचिरोली:-आज 28 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी संबंधाने राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 22.7.2022 रोजी जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार आरक्षण सोडत जाहीर करावयाचे होते. त्या अनुषंगाने चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्या नियंत्रणात पंचायत समिती, मुलचेरा येथील सभागृहात तहसीलदार कपिल हटकर व गटविकास अधिकारी मनोहर रामटेके यांच्या उपस्थितीत मुलचेरा पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून महत्त्वाच्या गणावर महिलांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
मुलचेरा तालुक्यात तीन जिल्हा परिषद क्षेत्र असून त्यात विवेकानंदपूर,गोमणी आणि लगाम माल चा समावेश आहे.विवेकानंदपूर गटात अडपल्ली चक, विवेकानंदपूर,गोमनी गटात गोमणी, सुंदरनगर आणि लगाम चक गटात लगाम चक आणि लगाम माल या सहा गणांचा समावेश आहे.या सहाही गणांचा आरक्षण सोडत जाहीर झाला असून सहा गणासाठी तीन जागा खुले,दोन जागा अनुसूचित जमाती तर एक जागा नामप्र साठी सोडण्यात आले आहे.
अडपल्ली चक साठी नामप्र,विवेकानंदपूर साठी अनुसूचित जमाती (महिला),गोमणी साठी खुला,सुंदरनगर साठी खुला (स्त्री),लगाम चक साठी खुला (स्त्री),लगाम माल साठी अनुसूचित जमाती अशी सोडत काढण्यात आली. सुरुवातीला निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर महिला जागेसाठी चिट्टया टाकून सोडत काढण्यात आली. एकंदरीत महत्त्वाच्या पंचायत समितीच्या गणावर त्यावेळी महिलांचे वर्चस्व असणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.एकंदरीत तालुक्यातील तीन जागा या महिलांसाठी रखीव असणार असून त्यात दोन खुले तर एक अनुसूचित जमाती साठी राहणार आहे.यावेळी पंचायत समितीच्या सभागृहात विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Mulchera Panchayat Samiti released reservation; Dominance of women in important positions
Gadchiroli:-Today on 28th July in connection with the general election of Zilla Parishad and Panchayat Samiti in Gadchiroli district, the release of reservation was to be announced as per the revised program announced by the State Election Commission on 22.7.2022. Accordingly, under the control of Chamorshi sub-divisional officer Uttam Todsam, Panchayat Samiti, Mulchera, in the presence of Tehsildar Kapil Hatkar and Group Development Officer Manohar Ramteke, the reservation of Mulchera Panchayat Samiti Gana has been announced and the dominance of women on important Gana has become clear.
Mulchera taluka has three Zilla Parishad areas which include Vivekanandapur, Gomani and Lagam Mal. Vivekanandpur group consists of Adapalli chak, Vivekanandpur, Gomani group includes Gomani, Sundernagar and Lagam Chak group includes six ganas namely Lagam Chak and Lagam Mal. These six ganas leave the reservation. It has been announced that three seats are open for six Ganas, two seats are for Scheduled Tribes and one seat has been left for Nampra.
For Adapalli Chak Nampra, for Vivekanandpur Scheduled Tribe (Female), Open for Gomani, Open for Sundarnagar (Female), Open for Lagam Chak (Female), Scheduled Tribe for Lagam Mal. Initially, the reservation was announced as per the order given by the Election Commission. After that, tickets were drawn for the women’s seat. It is clear that women will dominate the number of important Panchayat Samiti at that time. Overall, three seats in the taluka will be reserved for women, two of them will be open and one will be for Scheduled Tribes.