भद्रावतीः- तालुक्यातील माजरी येथील पुराने प्रभावित झालेल्या शांतीनगर या वेकोली कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला इंटकचे महासचिव के.के. सिंह यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व तेथील वेकोली कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला .त्याचप्रमाणे या वसाहतीतील नुकसानीचा आढावा घेऊन वेकोली प्रशासनासने येथील प्रभावित वेकोली कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली .
या संबंधात लवकरच वेकोली प्रशासनासोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या मागणीला भद्रावती वरोरा -क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही पाठिंबा दिला आहे. आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे माजरी गाव अर्धे अधिक पाण्यात गेले होते ,यात वेकोली कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या माजरी येथील शांती वसाहतीत पुराचे पाणी घुसून येथील वेकोली कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रभावित झाले होते. घराघरात पाणी घुसल्यामुळे येथील कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागला व त्यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले होते. यावेळी सिह त्यांचे सोबत आ. प्रतिभा धानोरकर, इंटक माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, संजय दुबे, परमानंद चौबे ,अनिल सिंह ,ओमप्रकाश वैद्य, साईनाथ वाकुलकर, अनंता आंबीलकर, गोलाकुंमरया ,सुनील श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.
INTAK General Secretary KK Singh’s visit to the flood-affected Vekoli employees’ colony
Seeking help from Vekoli administration
Bhadravati:- Intac Secretary General K.K. Singh visited and inspected the situation there and interacted with the families of the Wekoli employees there.Similarly, after taking stock of the damage in this colony, the Wekoli administration demanded financial assistance to the affected Wekoli employees.
In this regard, he said that a meeting will be organized soon with the Vekoli administration. Bhadravati Varora MLA Pratibha Dhanorkar has also supported this demand. Due to the heavy rains during the week, Majri village was half submerged in water, in which the families of Vekoli employees were affected by flood water entering Shanti Colony in Majri, which is a colony of Vekoli employees. Due to water entering the house, the family had to suffer a lot and they also suffered huge financial loss. This time Sih came with them. Pratibha Dhanorkar, President of Intak Majri Kshetra Dhananjay Gundawar, Sanjay Dubey, Parmanand Choubey, Anil Singh, Omprakash Vaidya, Sainath Vakulkar, Ananta Ambilkar, Golakumraya, Sunil Srivastava etc. were present.