मुलचेरा:- जवाहर नवोदय विद्यालयच्या इयत्ता 6 वीत प्रवेशासाठी शैक्षणिक सत्र 2021-22 या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलचेरातील 6 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुलचेराचे तहसीलदार कपिल हटकर यांनी विध्यार्थ्यांना आपल्या कार्यालयात पाचारण करून सर्व विध्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम,नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
27 जुलै रोजी तहसील कार्यालय मुलचेरा येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विध्यार्थी तथा मुलचेराचे विद्यमान तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी नवोदय विद्यालयातील आपले अनुभव कथन करतानाच विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तहसीलदार कपिल हटकर यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असतात.मात्र संधीचं सोनं करणे आपल्या हातात असते.तुमच्या आयुष्यातील ही खूप मोठी संधी असून त्याचं सोनं करण्यासाठी खूप अभ्यास करा.स्वतःचं आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक करा.असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले.
संपूर्ण भारतात 30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा घेण्यात आली होती.राजे धर्मराव हायस्कुल,मुलचेरा येथील केंद्रात विध्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी 263 विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते. त्यापैकी 248 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.नुकतेच निकाल जाहीर झाला असून त्यात केवळ 6 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.त्यात खाजगी शाळेतील तीन तर जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या सर्व विध्यार्थी 2022-23 या नूतन शैक्षणिक वर्षात जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता सहावीत प्रवेश घेतले असून 27 जुलै रोजी शाळेत ऋजु झाले.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.काव्या महेश गुंडेटीवार हैदराबाद इंटरनॅशनल स्कुल,मुलचेरा,कु.औक्षणी पराग दुर्योधन ग्रीनलिफ पब्लिक स्कुल मुलचेरा,सुमित सुरेश दब्बा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मल्लेरा,कु.मनस्वी शामु आत्राम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम,अधर्व अनिल मेकलवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहूर्ली,सिद्धांत रवींद्र झाडे ग्रीनलिफ पब्लिक स्कुल,मुलचेरा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी सुद्धा तहसीलदार कपिल हटकर आणि तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आभार मानले.खूप अभ्यास करणार असल्याचेही ग्वाही दिली.तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चिमुकल्यांना केलेला मार्गदर्शन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मोलाचा ठरणार हे विशेष.
The Tehsildar wished the students a bright future
Six students from Mulchera passed the Navodaya exam
Mulchera:- 6 students from Mulchera have passed the examination conducted in the academic session 2021-22 for admission to Class 6 of Jawahar Navodaya Vidyalaya. Mulchera Tehsildar Kapil Hatkar invited the students to his office and wished all the students for a bright future by giving them bouquets and gifts. Taluka Agriculture Officer Vikas Patil, Deputy Tehsildar Sarvesh Meshram, Deputy Tehsildar Rajendra Talande and other dignitaries were present on this occasion.
In a program held at Tehsil Office Mulchera on July 27, former student of Jawahar Navodaya Vidyalaya and current Taluka Agriculture Officer of Mulchera, Vikas Patil, narrated his experiences in Navodaya Vidyalaya and gave valuable guidance to the students. Making gold is in your hands. This is a very big opportunity in your life and study hard to make it gold. Make yourself and your Gadchiroli district famous. He also said this in his guidance.
Jawahar Navodaya Vidyalaya exam was conducted on 30th April all over India. The students gave this exam at the center of Raje Dharmarao High School, Mulchera. 263 students had filled the application form for this exam. Out of them 248 students appeared in this exam. The result was announced recently and only 6 students have passed in it. They include three students from private schools and three students from Zilla Parishad schools. All these students are studying in Class VI at Jawahar Navodaya Vidyalaya Ghot in the new academic year 2022-23. Got admitted and joined the school on 27th July.
Among the pass students are Ms. Kavya Mahesh Gundetiwar Hyderabad International School, Mulchera, Ms. Aukshani Parag Duryodhan Greenleaf Public School Mulchera, Sumit Suresh Dabba Zilla Parishad Higher Primary School Mallera, Ms. Manasvi Shamu Atram Zilla Parishad Higher Primary School Lagam, Adhvar Anil Mekalwar District The students of Parishad Higher Primary School Mohurli, Siddhanta Rabindra Zade Greenleaf Public School, Mulchera are included.
The students also thanked Tehsildar Kapil Hatkar and Taluka Agriculture Officer Vikas Patil. They also assured that they will study hard. It is special that the guidance provided by the senior officials of the taluka will be valuable for their bright future.