वरोरा :- २६ जुलै १९९९ रोजी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तान सैन्याला नेस्तनाबुत करून भारतीय सैनिकांनी विजय संपादन केल्याचा दिन म्हणजे कारगिल विजय दिन. .देशाच्या या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वरोरा येथील एअरबॉर्न ट्रेनिंग स्कूल , माजी सैनिक संघटना , पैगाम साहित्य मंच व योगी अरविंद बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
. सदर कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले होते. सकाळी शहीद चौक येथे अमर जवानांच्या स्तंभास रीत चढवून ज्योत प्रकाशित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ऑननरी कॅप्टन वामन निब्रड (माजी सैनिक), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे , आनंदवन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुहास पोतदार, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मृणाल काळे , लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.जयंत बंडावार हे व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी मान्यवरांनी कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला व सर्व उपस्थितांनी जवानांच्या शौर्याला सलाम केला . यावेळी आनंद निकेतन महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेट ने पथसंचलन केले.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र स्थानिक कटारिया ,मंगल कार्यालय येथे घेण्यात आले. यावेळी आनंदवन येथील दिव्यांग मुलांनी देशभक्ती पर गीतावर समूह व एकल नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ऑननरी कॅप्टन वामन निब्रड तर उदघाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष्य नोपानी (आय पी एस ) प्रमुख अतिथी म्हणून आनंदवन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, दालमिया सिमेंट ग्रुपचे सुनील भुसारी , पैगाम साहित्य मंचाचे अध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिट्य म्हणजे शाहिद जवानांच्या पत्नींचा वीररानी म्हणून सत्कार करण्यात आला तसेच वरोरा तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात चमकविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला . आय.य.एस झाल्या बद्दल आदित्य जीवने यांच्या आई वडिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रोटेरियन अदनान सिद्दीकोट व त्यांच्या चमूने देशभक्ती पर गीत गायन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एअरबॉर्न ट्रेनिंग स्कूल , माजी सैनिक संघटना , पैगाम साहित्य मंच व योगी अरविंद बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली .