नागपुर:- एका पोलीस अधिकाऱ्याने मुख्यालयातच स्वतःला गळफास लावला. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकानं आत्महत्या केली. शशिकुमार शेंडे असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. शशिकुमार गेल्या तीन वर्षांपासून पोलीस मुख्यालयात तैनात होते. त्यांच्या पत्नीही पोलीस विभागात तैनात आहेत. आज दुपारी मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्तेचं कारण अस्पष्ट आहे. नागपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.