भद्रावती – बँक ऑफ बडोदाच्या ११५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील बरांज तांडा येथील धमाबाई प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेला पिण्याच्या पाण्याची आरओ मशीन भेट देऊन बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
बँक ऑफ बडोदाचे सरसंस्थापक सयाजीराव गायकवाड महाराज यांनी सन १९०८ मध्ये बडोदा येथे बँकेची स्थापना केली त्याला ११४ वर्षे पूर्ण होऊन बँकेने ११५ व्या वर्षात पदार्पण केले.त्यानिमित्त तालुक्यातील बरांज तांडा येथील धमाबाई निवासी आश्रम शाळेला बँकेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी आरओ मशीन भेट देण्यात आली.यावेळी बँकेचे व्यवस्थापक अतुल ठावरी,प्राचार्य पी.एफ पवार,मुख्याध्यापक डी.के.पवार,शिक्षक व्ही. व्ही.राठोड,शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर भद्रावती शाखेमध्ये सरसंस्थापक सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी नगर पालिकेचे उप मुख्याध्याधिकारी जगदिश गायकवाड,लेखापाल लहू लेंगरे,बँकेचे वरिष्ठ लिपिक अतुल जाधव,लिपिक राहुल माथनकर,दिलीप ठेंगे,दिलीप मांढरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी नितीन चेंदे,सुशांत गावंडे,धनराज लांडगे, रामा मत्ते यांनी सहकार्य केले.