बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी दिले जीवनदान
वरोरा (आशिष घुमे):- तालुक्यातील टेमुर्डा परिसरात जामणी रोड लगत असलेल्या खड्यांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पामधील राख या खड्यांमध्ये टाकल्याने पावसामुळे दलदल निर्माण झाले आहे यात १९ जुलै ला एक गाय फसून असल्याची माहिती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना मिळताच घटनास्थळ गाठून अथक परिश्रमाने गायीला बाहेर काढून जीवनदान दिले .
वरोरा शहरालगत दोन वीजनिर्मिती प्रकल्प आहे . या वीजनिर्मिती कंपन्यांमधून निघणारी राख बाहेर काढण्याचे कंत्राट ट्रान्सपोर्ट कंपन्यांना दिले जातात . कमी वेळात जास्त ट्रिप मारता याव्या यासाठी . या ट्रान्सपोर्ट मालकांकडून जागा मिळेल त्या ठिकाणी राख खाली केली जात आहे . यामुळे मानवांच्या तसेच जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होत असून . असाच काहीसा प्रकार १९ जुलै ला टेमुर्डा परिसरात बघायला मिळाला . या अगोदर या परिसरात जंगलामध्ये राख टाकत असल्याचे निदर्शनास आले होते . मागील अनेक दिवसांपासून तालुक्यात , शहरात हा प्रकार राजरोसपणे सुरु असून . या बाबत कंपनी व्यवस्थापनाच्या लोकांना विचारणा केली असता ती राख आमची नाहीच असे उत्तर त्यांच्या कडून मिळत असते . राख टाकण्यासाठी संबंधित विभागाची , ज्या हद्दूत टाकणार आहेत तेथील स्थानिक प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते . हे खड्डे बुजवितांना परवानगी घेतली होती का . ती राख दोन कंपन्यापैकी कोणत्या कंपन्यांची आहे . भविष्यात मानवी किंवा जनावरांची जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण . असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत . असे प्रकार पुन्हा घडू नये या साठी प्रशासनाने या गोष्टी नजरअंदाज न करता संबंधितांवर कारवाई करावी . व राखेची टेस्टिंग करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .
फसलेल्या गायीला बाहेर काढण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बराच संघर्ष करावा लागला . हि मोहीम फत्ते करण्यासाठी बजरंग दलचे तेजस रेड्डी , अमोल चनकापुरे, यश पोटावी ,विलास बावणे , साहिल राजकुमार , मोरू खीरटकर, हर्षल कायरकर , अंकित तिखट , भारत झिले, अनिकेत लालसरे, अमित डाहुले , मधू तिखट , योगेश दुबे यांनी अथक परिश्रम घेतले