भद्रावती : अतिवृष्टीने भद्रावती तालुक्यातील कोंढा हे गाव अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे पूर्णतः पाण्याखाली आले आहे. कोंढा नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने कोंढावस्तीसह परिसरातील माजरी, पाटाळा, पळसगाव यांचा संपर्क तुटला आहे. याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भेट देऊन पुरपरिस्थितीची पाहणी केली.
कोंढ्याला चहुबाजूने पाण्याचा वेढा असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला, त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यासाठी प्रशासनाला कळवून बोट बोलाविली आणि त्याठिकाणी पिण्याचे पाणी पोहचविण्यात आले. येत्या काही तासात नागरीकांचे रेस्क्यू देखील पुर्ण होईल.यावेळी भाजपा ज़िल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे ,जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, तालुका महामंत्री नरेन्द्र जिवतोडे, भाजयुमो चे आकाश वानखेडे,महामंत्री विजय वानखेडे, जेष्ठ नेते अफजलभाई, माजी जि. प. सदस्य रंजित सोयाम, यशवंत वाघ उपस्थित होते.