चंद्रपूर : भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी मंगळवारी पूरग्रस्त घुग्घुस शहराची पाहाणी केली.
वर्धा नदीच्या धरणाचे पाणी सोडल्याने सोमवारी, मध्यरात्रीच्या सुमारास घुग्घुस शहराच्या शास्त्री नगर, आंबेडकर नगर व शिवनगर वसाहतीत वर्धा नदीच्या पूराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले.
त्याअनुषंगाने पूरग्रत भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. या परिसराच्या संपूर्ण पूरग्रस्त भागाचा आढावा घेत समस्या जाणून घेतल्या. आंबेडकर नगर येथील अनेक नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरल्याने त्यांनी आपल्या घरातील सामान बाहेर काढले.
घुग्घुस भाजपातर्फे येथील नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली. त्यांना आंबेडकर भवन येथे राहण्यासाठी हलविण्यात आले व टेम्पो क्लब येथे सुद्धा त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली.घुग्घुस भाजपातर्फे घुग्घुस शहराच्या आंबेडकर नगर, शास्त्री नगर भागातील पूरग्रस्तांना तत्काळ मदत करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, वर्धा नदीच्या धरणाचे पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीच्या जवळील गावामध्ये मोठया प्रमाणात पूराचे पाणी येत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या त्यांच्या सुचनेप्रमाणे प्रशासनाने मदतीचे कार्य सुरु केले. पूरग्रस्तांना ज्या मदतीची आवश्यकता असेल प्रशासना सोबत सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा जनतेच्या पाठीशी उभा राहील व गरजू लोकांना सर्वतोपारी मदत भाजपातर्फे करण्यात येईल.
शिवनगर येथील ख्रिस्त कब्रस्थान येथे पूराचे पाणी शिरले व काही घरात पुराचे पाणी शिरले. बेलोरा घाटावरील हिंदू स्मशान भूमीत ही पूराच्या पाण्याने व्यापली.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, नपचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, श्रीकांत सावे, मल्लेश बल्ला, विक्की सारसर, सुनील बाम, अनुप जोगी, गुरूदास तग्रपवार नपचे कर्मचारी विठोबा झाडे, हरी जोगी उपस्थित होते.तलाठी कार्तिक आत्राम तथा परशुराम पेंदोर यांनी पूरग्रस्त भागाचा पंचनामा केला आहे.