राजुरा – येथील वरूर तलाठी साज्या अंतर्गत येत असलेल्या वरूर तलाठी कार्यालयातील तलाठी विनोद महादेवराव गेडाम यांना एका जुन्या रेतीचा प्रकरणात लाचेची मागणी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, त्यांना महसूल विभाग उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनाने आदर्श तलाठी पुरस्कार दिला आहे. …तक्रारकर्त्याचा रेतीचा व्यवसाय असून त्यांचा विनापरवाना असलेला ट्रॅक तलाठी विनोद गेडाम यांनी दि ८ फेब्रुवारी २१ ला पकडला होता.त्यावेळी ट्रॅक सोडण्यासाठी तलाठी गेडाम यांनी ७० हजार ची मागणी केली व तक्रारकर्त्यांनी त्याचवेळी ३५ हजार दिले.पण उर्वरीत पैशासाठी गेडाम यांनी तगादा लावला.अखेर २५ हजार रुपयांची तडजोड करण्यात आली.तक्रारकर्त्याला लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी याची तक्रार त्यांनी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे केली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली वरूर तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला.यावेळी चमुसोबत अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उप अधिक्षक अविनाश भामरे अधिकारी हजर होते.या कारवाई वेळी नारेशकुमार ननावरे, रोशन चांदेकर,रवी ठेंगले,संदेश वाघमारे,मेघा मोहूर्ले, सतीश सिडाम यांनी सहकार्य केले.या कारवाईने तलाठ्यामधेच चांगलीच खळबळ माजली आहे.