गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):- अर्थसंकल्प सन २०१९-२० अंतर्गत गोंडपिपरी येथे आज दि.१२ मंगळवारी पंधरा कोटीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला.
आज महाविकास आघाडी सत्तेत नसली तरी विकास कामे थांबणार नाही.विकास निधी आम्ही कमी पडू देणार नाही सत्तेत असणारे देखील आमचे मित्र आहेत त्यामुळे विकास निधी मिळेलच असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले ते प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
तालुक्यातील कृषी,महसूल,भूमिलेख,सेतू अनेक कार्यालय एका इमारतीच्या छताखाली येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार त्यांचा त्रास कमी होईल असे देखील प्रतिपादन आमदारांनी केले.यावेळी खासदार बाळू धानोरक,आमदार सुभाष धोटे,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंतराव भास्करवार,तहसीलदार के डी मेश्राम,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,उपनगराध्यक्ष सारिका कुळमेथे, बाजार समिती सभापती सुरेश चौधरी,ठाणेदार जीवन राजगुरू,बांधकाम विभागाचे उपअभियंता वैद्य, काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,महिला तालुका अध्यक्ष रेखा रामटेके,शहर अध्यक्ष देवेंद्र,विनोद नागापुरे यांची मंचावर उपस्थिती होती.नगरसेवक सोबतच काँग्रेस कार्यकर्ते तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सूत्र संचालन तथा आभार सचिन फुलझले यांनी केले