वरोरा (आशिष घुमे ) :- वरोरा वणी रोड चौपदरीकरण कामासाठी मौजा शेंबळ येथील ६७ एकर जमीन संपादित करण्यात आली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कडून, संपादित जमीनीवर दोन्ही बाजूला बाउंड्री वॉल बांधण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पाऊसाचे पाणी, बाहेर पडण्याचे स्त्रोत बंद होऊन ते शेतातच जमा राहते यामुळे अनेक शेताचे रूपांतर तलावात झाले आहेत. तसेच रोड ची उंची ईतकी झाली की, शेतकऱ्यांना शेतात, बैलगाडी किंवा छोटेखानी वाहनांची ने – आण करने कठीण झाले आहे.
भूसंपादन सुध्दा कवडीमोल भावानेच करण्यात आले होते परंतु शेतकऱ्यांनी , प्रशासनासोबत असहकार आंदोलन पुकारून,मोबदला बद्दलचा तिडा विभागीय आयुक्त नागपूर यांच्या मध्यस्थीने सोडविण्यास शेतकऱ्यांनी यश मिळविले. आता याची झळ सोसावी लागली आणि लागणार ती शेतकऱ्यांनाच.करोडो रुपयांचा गुळगुळीत रस्ता झाला पण आम्हा शेतकऱ्यांचे काय? शेतकर्यांना दुय्यम स्थानी ठेवून, साधलेला विकास
अशी एकंदरीत व्यवस्था झाली आहे. प्रशासनाने या पाण्याखाली गेलेल्या शेताचा पंचनामा करून,शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण साहेब एक माणूस म्हणून आम्हा शेतकऱ्यांच जगणं मान्य करावं अशी विंनती शेतकऱ्यांनी केली आहे .