गडचिरोली:-9 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील पेरमिली गावालगत असलेल्या नाल्यात प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशासनाने आज पहाटेपासून शोध मोहीम राबवून तीन मृतदेह बाहेर काढले असून त्या तिघांची ओळख पाठविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.सीताराम बिच्चु तलांडे रा.कासमपल्ली, सम्मी सीताराम तलांडे रा.कासमपल्ली आणि पुष्पा नामदेव गावडे मोकेला असे मृतकांचे नावे आहेत.
व्हिडिओ बघा –
सीताराम बिच्चु तलांडे,सम्मी सीताराम तलांडे आणि पुष्पा नामदेव गावडे असे तीन प्रवासी कासमपल्ली फाट्यावरून मोकेला येथे पुष्पा गावडे हिच्या वडिलांच्या तेरावी च्या कार्यक्रमाला जात होते.अशी प्राथमिक प्राथमिक माहिती आहे.ट्रक मध्ये चालक,क्लिनर आणि तीन प्रवासी होते.पुरात वाहून गेल्यावर पहाटेच्या सुमारास सदर ट्रक नाल्यातील एका झाडाला अडकलेल्या स्थितीत आढळून आले. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी आपल्या चमुसोबत पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची पातळी वाढली होती.अश्या परिस्थितीतही एस डी आर एफ चे प्रमुख संतोष भंडारे आणि त्यांच्या चमूने शोधमोहीम राबवून तीन मृतदेहांना बाहेर काढले.
विशेष म्हणजे ट्रक चालक आणि क्लीनर मात्र,अजूनही बेपत्ता असल्याची माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.तिन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविले आहे.