गडचिरोली:- आज दिनांक 10 जुलै रोजी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा आंबटपल्ली ते खुदीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आल्याने आलापली ते मुलचेरा हा मार्ग राहादरीसाठी बंद झाला आहे.
8 जुलै रोजी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे 9 जुलै रोजी आल्लापल्ली ते मुलचेरा रस्त्यावरील गोमनी,आंबटपल्ली,भवानीपूर,बारसवाडा आणि मुलचेरा ते आष्टी दरम्यान कोपरअली जवळील दीना नदी ला पूर आल्याने दुपारी 2 वाजेपर्यंत हा मार्ग बंद होता. दुपारनंतर सर्वच नदी-नाल्यावर पूर ओसरल्यावर सदर रस्ता रहदारी सुरू झाला होता.मात्र,परत आज 10 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे आंबटपल्ली ते खुदीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आल्याने सदर मार्ग पुन्हा बंद झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने 72 तास रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रस्त्यावरील नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी उचित काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहे.
पावसाचा कहर बघता गोमणी नाल्याला आणि दीना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असून प्रत्येक बाबीवर लक्ष ठेऊन आहेत.पोलिसांतर्फे मुलचेरातील मुख्य चौकात बॅरिगेट्स लावून सदर मार्ग बंद करण्यात आले.