चंद्रपूर – शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड पुकारला आहे. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीत चंद्रपुरातील शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ आज चंद्रपुरात भव्य निदर्शने करण्यात आली.
सध्या राज्याच्या राजकारणात हाहाकार सुरु आहे, शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत राजकारणात नवे वादंग निर्माण केले आहे. अश्यातच शिंदे गटाने आम्हीचं खरे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे.
अश्यातच चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने २८ जूनला शासकीय विश्रामगृहात बैठक घेउन आमचा पक्ष शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भव्य निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका उज्ज्वला नलगे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, माजी नगरसेवक सुरेश पचारे, निलेश बेलखेडे, अब्दुल वसीम यांच्यासह आजी – माजी शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.