राजुरा : तालुक्यातील विविध गावांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी सूनिल उरकुडे मागील तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील असून आज रामपूर सारख्या क्षेत्रफळाच्या विस्तारलेल्या शहरालगतच्या गावात त्रेचाळीस लक्ष बहात्तर हजार रुपये किमतीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण केले आहे. त्यांचा ग्रामीण भागातील जनतेप्रती असलेला सेवाभाव व विकास कामासंबंधी कार्यतत्परता यातून त्यांची जनसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता दिसून येत असल्याचे कौतुक करीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रामपूर येथे आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उदघाटक व अध्यक्षस्थानी हंसराज अहीर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री होते तर प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती सुनील उरकुडे माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, भाजपा नेते राजू घरोटे, वंदनाताई गौरकार सरपंच रामपूर, सुनीता उरकुडे उपसरपंच रामपूर, ग्राम पंचायत सदस्य विलास कोदिरपाल, रमेश झाडे, जगदीश बुटले, हेमलताताई ताकसांडे, सिधुताई लोहे, शीतल मालेकर, लता डकरे, संगीता विधाते, कोलगावचे सरपंच पुरुषोत्तम लांडे, हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष गुलाब दुबे, मारोती जानवे, प्रकाश फुटाणे, सचिन शेंडे, रामा घटे उपस्थित होते.
यावेळी रामपूर येथे चार लक्ष किंमतीचा सिमेंट काँक्रीट रोड, आठ लक्ष किंमतीची सिमेंट काँक्रीट नाली, सात लक्ष किंमतीचा आर. ओ. प्लांट, बारा लक्ष किंमतीची वर्गखोली बांधकाम, नऊ लक्ष किंमतीचे मंदिर परिसराला प्रिकॉस्टचे कंपाऊंड, एक लक्ष बहात्तर हजार रुपये किंमतीचा हायमास्ट व दोन लक्ष रुपये किंमतीचे ओपन जिम एकूण त्रेचाळीस लक्ष बहात्त्तर हजार लक्ष रुपये किंमतीच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याबरोबरच धिडशी व चार्ली येथे पाच पाच लक्ष किंमतीचे आर ओ प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सुनील उरकुडे यांनी सांगितले की जनतेनी दिलेल्या मतरुपी आशीर्वादाची परतफेड विकास कामांच्या माध्यमातून करीत असून भविष्यात सुद्धा ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहो. सरपंच गौरकार यांनी सांगितले की रामपूर वस्ती क्षेत्रफळाने विस्तारलेली असून गावाच्या विकासासाठी करोडो रुपये निधींची आवश्यकता असून हंसराज अहीर यांनी वेकोलीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मदत करण्याची विनंती केली. यावेळी हंसराज अहीर यांनी सुनील उरकुडे यांचा शाल श्रीफळ देत सत्कार केला.
कार्यक्रमाला दिलीप ठेंगणे, मारोती जानवे, मधुकर उरकुडे, किशोर शेंडे, रितेश पायपरे, कवडू ठेंगणे, मधुकर पोटे, रामा घटे, अविनाश सावनकर, विलास कोदिरपाल, मारोती कायळीगे, रमेश गौरकार, बाबुराव जंपलवार, नामदेव गौरकार, गणेश हिंगाने, प्रभाकर लडके, शंकर निमकर, शंकर उरकुडे, प्रमोद पाणघाटे, मारोती ढुमणे सह रामपूर वासिय उपस्थित होते.