डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
ओबीसी व विदर्भ विकासाकरिता अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन
चंद्रपूर : सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम पंधरवडा म्हणून साजरा करु असे प्रतिपादन विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी आज (दि.११) ला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.
सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस ३० जुन ला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजउपयोगी कार्यक्रम घेण्याचा मानस डॉ. जीवतोडे यांनी केला आहे. यामधे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, महिला आरोग्य शिबीर, गुणवंत विद्यार्थी सत्कार, अंध-अपंग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, गरजूंना मदतकार्य, आदी विविध सामाजिक उपक्रमांचा सहभाग राहील.
आज (दि.११) ला डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विविध नामवंतांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा प्रदान केल्या. दिवसभर भेटी घेणाऱ्यांची एकच गर्दी होती. दिवसभर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील आरोग्य केंद्रात रुग्णांना व सफाई कामगारांना फळ व मिठाई वाटप, विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरीकांना मिठाईवाटप, वृध्दाश्रमात धान्य वाटप, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुस्तक भेट आदि उपक्रम राबविण्यात आले.
याही अगोदर वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. अशोक जीवतोडे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त, पूरग्रस्त, कोरोनाने मृत झालेल्या पालकांची पाल्य आदींना संस्थेच्या विविध शाखेत निःशुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.
ओबीसी व विदर्भ विकासाकरिता अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन असेही डॉ. अशोक जीवतोडे पुढे बोलतांना म्हणाले.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.