भद्रावती :- टायगर ग्रुप, पाटाळा शाखेचे उद्घाटन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजही समाजाला व देशाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. अंकुश आगलावे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संगठन यांनी केले.
टायगर ग्रुप पाटाळा शाखेचे नुकतेच उद्घाटन समारंभ 30 मे ला ग्रामपंचायत पाटाळा समोर ,ग्रामविकास शाळेच्या खुल्या पटांगणावर पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. अंकुश आगलावे व अनिल जाधव, अध्यक्ष टायगर ग्रुप चंद्रपूर हे होते.
डॉ. आगलावे यांनी मंचावरून टायगर ग्रुप व मित्रपरिवारांना संबोधित करतांना छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार आत्मसात करून सामाजिक कार्य केले पाहिजे तसेच महाराजांचे कार्य व गुण आत्मसात करण्यास सांगितले. टायगर ग्रुप पाटाळा च्या माध्यमातून भविष्यात गोरगरीबांची सेवा घडण्याचे कार्य होणार आहे. वरोरा तालुक्यात गरजुंना मदत करण्याची भावना ग्रुपच्या माध्यमातुन रूजवून सामाजिक कार्य घडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश ठावरी व प्रमुख वक्ते रिषभ रिठ्ठे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनीत घागे ठाणेदार माजरी पोलीस स्टेशन , सलिम पठान टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा, मारोती नामे टायगर ग्रुप वरोरा शहर, बाला चांभारे टायगर ग्रुप तालुका वरोरा, विजय वानखेडे सरपंच ग्रा.पं. पाटाळा, विद्याताई आवारी उपसरपंच ग्रा.पं. पाटाळा, संदीप एकरे ग्रा.पं. सदस्य पाटाळा, शिल्पाताई भोस्कर सदस्य ग्रा.पं. पाटाळा उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता टायगर ग्रुपचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी पाटाळा गावांतील ज्येष्ठ नागरीक, युवावर्ग मोठया संख्येने उपस्थित होते .युवक मोठया संख्येने उपस्थित होते.