कोल्हापूर :- भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैर राजनैतिक संघटन असून शोषित गरीब पिडीत विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे काम मागील दहा वर्षापासून करीत आहेत.अशाच प्रकारे भारतीय विद्यार्थी मोर्चा ,भारतीय युवा मोर्चा ,भारतीय बेरोजगार मोर्चा ,भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ आणि भारतीय विद्यार्थी छात्रावास संघ या सर्व सहयोगी संघटनांचे संयुक्त एकदिवसीय भुदरगड तालुकास्तरीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबिर 5 जून रोजी शाहू वाचनालय गारगोटी या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा.नितीन जाधव(के.एच.कॉलेज गारगोटी) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती दीपक देवाळकर प्रभारी पश्चिम महाराष्ट्र बामसेफ हे राहणार आहेत.या कार्यक्रमाचे प्रशिक्षक नानासाहेब चव्हाण (प्रभारी पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चा) हे राहणार आहेत.
भारतीय विद्यार्थी मोर्चा हे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संघटन असून त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी तसेच युवा विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या यादृष्टीने यावर विचारमंथन केले जाणार आहे.हा कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाहू वाचनालय गारगोटी या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमासाठी विद्यार्थी युवा बेरोजगार विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक किरण कांबळे (प्रदेश महासचिव भारतीय विद्यार्थी मोर्चा) यांनी आवाहन केले आहे.