सभापती सुरेश चौधरी यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती
चंद्रपूर(आशिष घुमे)
दिनांक 29 मे 2022 ला झालेल्या गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक सभेत सात विरुद्ध दोन मतांनी कायदेशीर चौकशीअंती ठराव पारित करून संचालक मंडळाने बडतर्फ सचिव जिनेन्द्र सोनटक्के यांना सेवेत पूर्ववत घेण्याचा ठराव पारित करणे म्हणजे न्यायालयीन आदेशाचे पालन असून काही स्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आर्थिक घोडेबाजाराचा होत असलेला आरोप निराधार व खोटा असल्याचे स्पष्टीकरण संचालक मंडळाने दिले आहे.
.. सचिव जिनेन्द्र सोनटक्के हे 1998 पासून बाजार समितीत सचिव पदावर कार्यरत होते. संचालक मंडळाने दिनांक: 04/06/2020 रोजी कोणतेही कारणे दाखवा नोटीस न देता किंवा कोणताही दोष सिद्ध न करता सरळ सरळ संचालक मंडळाचे बैठकीत ठराव पारित करून त्यांना निलंबित केले. या बैठकीत उपस्थित सहाय्यक निबंधक प्रशांत धोटे यांनी ही पद्धत चुकीची असल्याचे लक्षात आणून देऊनही संचालक मंडळ मानले नाही त्यांनी सोनटक्के यांना निलंबित केले. या कार्यवाही विरोधात सचिव सोनटक्के यांनी दिनांक: 12/06/2020 विभागीय सहनिबंधक नागपूर यांचेकडे प्रकरण दाखल केले व झालेल्या कार्यवाही व र स्थगिती मिळवली सहा. निबंधकांच्या स्थगिती आदेशानुसार दिनांक: 15/06/2020 सचिव सोनटक्के यांना रुजू करून घेण्यात आले. मात्र दिनांक: 07/07/2020 विभागीय सहनिबंधक नागपूर यांनी दिलेली स्थगिती रद्द केली. त्यामुळे सोनटक्के सचिव पदावर कार्यरत राहू शकले नाही. सचि व सोनटक्के दिनांक: 21/07/2020 विभागीय सहनिबंधक यांच्या आदेशाविरोधात नागपूर हायकोर्टात गेले बाजार समितीने ही याच प्रकरणा संबंधात आपली याचिका दाखल केली. दिनांक: 13/08/2020 20 ला नागपूर कोर्टाने सचिव सोनटक्के व बाजार समितीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन” जैसे थे” चे आदेश दिले. दिनांक: 15/02/2021 ला नागपूर हायकोर्टाने हे प्रकरण निकाली काढण्यासाठी विभागीय सहनिबंधक नागपूर यांना आदेश दिलेत व प्रकरण परत पाठवले. दरम्यान विभागीय सहनिबंधक यांचा कोणताही आदेश प्राप्त न होताच संचालक मंडळाने सचिव सोनटक्के यांना दिनांक: 19/07/2021 ला ठराव पारित करून सचिन सोनटक्के यांना बडतर्फ केले. संचालक मंडळाच्या या कारवाई विरुद्ध सचिव सोनटक्के यांनी दिनांक: 19/08/2021 रोजी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे परत अपील दाखल केली. कोरोना चा कालखंड चालु झाल्यामुळे मध्ये सात महिने या प्रकरणात तारखा पडल्या नाही व सुनावणी झाली नाही. दिनांक :9/03/2022 निलंबित सचिव सोनटक्के यांच्या अपील क्रमांक: 06/21 वर बाजार समिती आणि सोनटक्के यांच्या वकिलांनी मांडलेले म्हणणे लक्षात घेतल्यानंतर विभागीय सहनिबंधक यांनी पुढील आदेश पारित केला. बडतर्फ सचिव सोनटक्के यांची अपील मंजूर केली, बाजार समिती चा दिनांक: 19/07/2021 चा सोनटक्के यांच्या बडतर्फीची चा आदेश रद्द केला, दिनांक: 30/01/2021 बाजार समितीने खातेनिहाय चौकशी करून दिलेलाअहवाल निरस्त ठरवून रद्द केला, दिनांक: 05/11/2020 चा खातेनिहाय चौकशीचा आदेश रद्द केला. तसेच बडतर्फी रद्द ठरवून पूर्ववत सेवेत घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर बाजार समितीला हा आदेश प्राप्त होताच कायदेशीर चौकशी व सर्व बाबी तपासून दिनांक: 29/05/2022 च्या कृषी उत्पन्न समिती गोंडपिपरी च्या मासिक सभेत सात विरुद्ध दोन मताने ठराव पारित करून सचिव सोनटक्के यांना पूर्ववत सेवेत घेण्यात आले न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून शक्य तितक्या लवकर आदेशाचे पालन करण्यात आले. मात्र काही स्वपक्षीय नाराज स्टंटबाजी कार्यकर्ते आपल्याच लोकांवर आर्थिक गैरव्यवहार करून सोनटक्के ला सेवेत घेतल्याचा करीत असलेला आरोप अतिशय दुःखद बेकायदेशीर व निराधार असल्याचे सभापती सुरेश चौधरी यांनी पुण्यनगरीला सांगितले. त्यांनी यासंदर्भात लेखी निवेदनही विविध प्रसिद्धीमाध्यमांना जारी केले आहे.